महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून भाजप नेते सतत सत्ताधारी नेत्यांवर आरोप करताना दिसून येत आहे. असे असताना आता भाजप नेत्या चित्रा वाघ एका प्रकरणात अडकण्याची शक्यता आहे. शिवसेना नेते रघूनाथ कुचिक यांच्यावर बलात्काराचे आरोप करणाऱ्या तरुणीने भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. (kuchik rape case new twist)
मला बळजबरीने पोलिसांना जबाब देण्यास चित्रा वाघ यांनी भाग पाडले आहे, असा गंभीर आरोप पीडित तरुणीने केला आहे. त्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी चित्रा वाघ यांच्यावर कारवाई करणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते रघूनाथ कुचिक यांच्यावर तरुणीने बलात्काराचे आरोप केले होते. त्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी हे बलात्काराचे प्रकरण लावून धरले होते. पण त्यानंतर आता तरुणीने चित्रा वाघ यांच्याबाबत गौप्यस्फोट केला आहे.
चित्रा वाघ यांनी माझ्यावर दबाव टाकत आरोप करण्यास सांगितले होते. त्यासाठी माझ्या मोबाईलमधून एका ऍपच्या साहाय्याने मेसेज पाठवण्यात आले होते. तसेच वाघ यांनी मला गोव्यात डांबून ठेवले होते. तसेच पोलिसांना विशेष जबाब देण्यासही मला भाग पाडले होते, असे तरुणीने म्हटले आहे.
दरम्यान, चित्रा वाघ यांच्यावर गंभीर आरोप झाल्यानंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. आता याप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्राच्या समाजकारणात, राजकारणात, जे घडतंय त अत्यंत दुर्दैवी असल्याचे रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे.
तसेच सरकारला बदनाम करण्यासाठी हे षड्यंत्र रचले जातात. यंत्रणेचा असा गैरवापर करणाऱ्यांवर निश्चितपणे कारवाई करण्यात येईल. आज मी पीडितेची भेट घेणार आहे. त्यानुसार सर्व माहिती घेऊन मी कारवाई करणार आहे, असे रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
सदावर्तेंना सुट्टी नाहीच! जामीन मिळताच सातारा पोलीस करणार उचलबांगडी, जाणून घ्या काय आहे प्रकरण…
द काश्मिर फाईल्सची टीम पुन्हा एकत्र, विवेक अग्निहोत्री दोन चित्रपटांतून बाहेर आणणार काळे सत्य
रखरखत्या उन्हात सायकलवरून फूड डिलिव्हरी करतोय शिक्षक, संघर्षगाथा वाचून पाणावतील डोळे