भारतीय संघ श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज बंगळुरूच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाच्या भक्कम यष्टिरक्षकाला संधी मिळाली नव्हती आता तिच संधी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मिळाली आहे. (ks bharat in indian team)
रोहित शर्मा नेहमीच खेळाडूंना संधी देण्यासाठी ओळखला जातो. अशा स्थितीत श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात तो स्टार यष्टीरक्षक फलंदाज केएस भरतला संधी देऊ शकतो. भरत हा जबरदस्त खेळाडू आहे, तो त्याच्या खेळीने पुर्ण सामना बदलू शकतो. केएस भरतच्या क्षमतेचा उपयोग केला तर तो मोठा खेळाडू होऊ शकतो, असे क्रिकेटतज्ज्ञांचे मत आहे. भरत हा खुप चांगला फलंदाज आहे.
केएस भरतने आयपीएलमध्ये आपली स्फोटक फलंदाजी दाखवली होती. त्याने चांगल्या चांगल्या गोलंदाजींची बत्ती गुल केली आहे. रॉयल चॅलेंजर बेंगलोरच्या वतीने त्याने अनेक तुफानी खेळी खेळून त्याने सर्वांची मने जिंकली आहेत. भरतमुळेच आरसीबीचा प्लेऑफपर्यंतचा प्रवास सोपा झाला होता.आयपीएल २०२१ मध्ये त्याने ८ सामन्यात १९१ धावा केल्या होत्या.
न्यूझीलंडविरुद्ध ऋद्धिमान साहाच्या दुखापतीनंतर या फलंदाजानेच विकेटकीपिंग केली होती. त्याचे विकेटकीपिंग कौशल्यही अप्रतिम आहे. केएस भरत देखील पंतप्रमाणेच फलंदाजी करतो आणि त्याच्या फलंदाजीत धोनीसारखाच फिनिशिंग टच आहे. केएस भरतने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ५२ चेंडूत ७८ धावा केल्या, ज्यात ३ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता.
भरतने देशांतर्गत स्पर्धा आणि आयपीएलमध्ये आपले फलंदाजीचे कौशल्य जबरदस्तपणे सादर केले आहे. या फलंदाजाने विजय हजारे ट्रॉफीमध्ये शतकीय खेळी खेळल्या होत्या. त्याने गुजरातविरुद्ध १५६ धावा आणि हिमाचलविरुद्ध १६१ धावा केल्या. तो नेहमीच लांब षटकार मारण्यासाठी प्रसिद्ध आहे.
केएस भरतचा न्यूझीलंडविरुद्धच्या संघात समावेश होता, मात्र त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. जेव्हा ऋद्धिमान साहा जखमी झाला तेव्हा तो त्याच्या जागी विकेट कीपिंगसाठी तो आला होता. त्याचे यष्टिरक्षण कौशल्यही अप्रतिम आहे. त्याचा हा खेळ पाहून दिल्ली कॅपिटल्स संघाने त्याला २ कोटी रुपयांना विकत घेतले आहे, जे त्याच्या मूळ किमतीपेक्षा १० पट जास्त आहे.
महत्वाच्या बातम्या-
फोटोग्राफरचा एक क्लिक आणि ‘त्या’ मुलीचं संपूर्ण आयुष्यच बदललं, वाचा फुगे विकणाऱ्या किसबूची कहाणी
‘आई कुठे काय करते’ मालिकेत मोठा ट्विस्ट; आशुतोषमुळे अरुंधतीच्या आयुष्यात येणार नवीन वादळ
अभिनेत्री जुई गडकरीला झालाय गंभीर आजार; पोस्ट शेअर करत म्हणाली, हळूहळू शरीरातील अवयव..