Share

ट्रॉफी जिंकताच हार्दिक पांड्याचं घरी झालं जंगी स्वागत, भाऊ क्रुणालने ‘अशी’ केली होती तयारी

इंडियन प्रीमियर लीग (IPL 2022) च्या 15 व्या हंगामाची सांगता झाली आणि यावेळी ट्रॉफी गुजरात टायटन्सने आपल्या नावावर केली. संघाचा कर्णधार असलेला हार्दिक पांड्या विजयानंतर त्याच्या घरी पोहोचला, जिथे त्याचा भाऊ आणि लखनऊ सुपरजायंट्सचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्याने त्याला एक भव्य पार्टी दिली.

त्याचा फोटो कृणालने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरही शेअर केला आहे, जो वेगाने व्हायरल होत आहे. फोटो शेअर करत क्रुणाल पांड्याने एक खास संदेशही दिला आहे. आयपीएल 2022 संपल्यानंतर सर्व खेळाडू आपापल्या घरी पोहोचले आहेत.

अशा परिस्थितीत गुजरात टायटन्सचा विजयी संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या त्याच्या घरी पोहोचला तेव्हा त्याच्या भावाने त्याच्या स्वागताची जोरदार तयारी केली होती. संपूर्ण घर फुग्यांनी सजले होते आणि अभिनंदन हार्दिक पांड्या असं लिहीलं होतं. त्याचा फोटो कृणाल पांड्याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवर शेअर केला आणि लिहिले की ‘माझ्या भावा, तुझ्या यशामागे किती मेहनत आहे हे फक्त तुलाच माहीत आहे.

कृणाल पुढे म्हणतो, ‘लोकांनी तुझ्यासाठी खूप काही लिहिलं आहे, पण तू इतिहास लिहित आहेस. एक लाखाहून अधिक लोक तुझ्या नावाचा जयजयकार करत होते तेव्हा मी तिथे असतो तर मला बरं वाटलं असतं. या फोटोंमध्ये हार्दिकने नारंगी रंगाचा टी-शर्ट आणि खाली काळ्या रंगाचा टी-शर्ट घातलेला दिसत आहे.

तसेच मागील बाजूस अतिशय सुंदर सजावट करण्यात आली आहे. तर तिथेच, दुसऱ्या फोटोत हार्दिक ट्रॉफी हातात घेऊन हसताना दिसत आहे. हे दोन्ही फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून आतापर्यंत दीड लाखांहून अधिक लोकांनी ते लाईक केले आहेत.

दरम्यान, हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सचा संघ पहिल्यांदाच इंडियन प्रीमियर लीग खेळण्यासाठी आला होता आणि त्याच्या पहिल्याच सत्रात टीमने आश्चर्यकारक कामगिरी केली आणि सीझनची ट्रॉफी जिंकली. त्याचवेळी कर्णधार हार्दिक पांड्या या सिजनमध्ये झळकत राहिला आणि त्याच्या नावावर 15 सामन्यांमध्ये 487 धावा आणि 8 विकेट आहेत. हार्दिकची ही कामगिरी पाहून आगामी काळात त्याला भारतीय क्रिकेट संघात टी-20 चा कर्णधार बनवले जाऊ शकते, असे बोलले जात आहे.

महत्वाच्या बातम्या
केकेच्या निधनानंतर पाकीस्तानही बुडाला दुखात, सोशल मिडीयावर चाहत्यांच्या भावूक प्रतिक्रीया; पहा नेमकं काय म्हणालेत..
थेट मुळावर घाव! सोनिया आणि राहूल गांधींचा पाय खोलात; ईडीने उचलले मोठे पाऊल
अमरावतीत दोन वाघिणी येणार आमनेसामने! नवनीत राणांविरोधात प्रणिती शिंदें पदर खोचून मैदानात उतरणार
VIDEO : तडफडून झाला केके यांचा मृत्यू? वारंवार पित होते पाणी; शेवटच्या क्षणांचा ‘तो’ धक्कादायक व्हिडिओ आला समोर

खेळ ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now