Share

प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत घडला भयानक प्रकार, तीन लोकांनी कार थांबवून केलं ‘हे’ धक्कादायक कृत्य

मनोरंजनविश्वात गेल्या काही दिवसांपासून अनेक धक्कादायक घटना घडत आहे. असे असतानाच आता प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत एक भयानक प्रकार घडला आहे. ‘पंड्या स्टोअर’ या मालिकेत सुमनची भूमिका करणारी कृतिका देसाई विनयभंगाची शिकार झाली आहे. (kritika desai shocking incident)

अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. तसेच तिने त्यासोबत एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे ज्यामध्ये तिने रस्त्याच्या मधोमध कसे बदमाशांनी तिचा छळ केला हे सांगितले. सध्या हा व्हिडिओ सगळीकडे चर्चेचा विषय ठरला आहे.

कृतिका देसाईने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की कृतिका तिच्या कारमध्ये बसलेली आहे. कृतिकाच्या ड्रायव्हरसोबत तीन जण वाद घालत आहेत. अभिनेत्रीने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत तिच्यासोबत घडलेल्या घटनेबद्दल सांगितले.

कृतिकाने लिहिले की, माझा विश्वास बसत नाही. शूटिंग संपवून मी घरी परतणार होतो. वाटेत तिघांनी माझी गाडी थांबवली. हे तिघे दुचाकीवरून आले होते. माझ्या ड्रायव्हरला थांबायला सांगितले. माझ्या गाडीत ड्रग्जची झडती घेणार असल्याचे तिघांनी सांगितले.

तसेच या लोकांनी मला त्यांचा फेक आयडी दाखवला. त्यानंतर हे लोक गैरवर्तन करू लागले. यानंतर मी त्यांना म्हटले की लेडी कॉन्स्टेबल कुठे आहे, तिला बोलवा. यावेळी मी या लोकांचा व्हिडिओ बनवला. फिल्मसिटी ते गोकुळधाम दरम्यान ही घटना घडली. हे लोक अशा प्रकारे लोकांना घाबरवतात. गोंधळ होईल असे वाटताच ते पळून गेले, असेही कृतिकाने म्हटले आहे.

पोलीस ठाण्यात जाऊन आपण तक्रार करणार आहे. सर्व कलाकारांनी आणि इतर लोकांनीही सतर्क राहावे. हे लोक दुसऱ्या ठिकाणी जाऊन हे काम नक्कीच करतील, असेही कृतिकाने म्हटले आहे. कृतिका देसाई ‘पंड्या स्टोअर’ या मालिकेत सुमन पंड्याची भूमिका साकारत आहे. ही मालिका तिच्या कथा आणि ट्विस्टमुळे प्रेक्षकांना खूप आवडते.

महत्वाच्या बातम्या-
उगाचच कोणावर पराभवाचे खापर फोडायचे म्हणून फोडू नका; आमदार हितेंद्र ठाकूर संजय राऊतांवर भडकले
‘ते’ वादग्रस्त व्यक्तव्य भोवलं! नुपूर शर्माचा पाय खोलात; पोलिसांनी घेतली मोठी अॅक्शन
मी घोडा नाही आमदार आहे, मला विकत घेणार पक्ष मला बघायचाय; हितेंद्र ठाकूर शिवसेनेवर भडकले

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now