ईडीने बुधवारी दुपारी मंत्री नवाब मलिक यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली. सुमारे ८ तास चाललेल्या प्रदीर्घ चौकशीनंतर ईडीने ही कारवाई केली. अटकेनंतर नवाब मलिकांची जेजे रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती आणि त्यानंतर मलिकांना पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले होते. (kranti redkar reaction on nawab malik arrest)
सुनावणीदरम्यान, ईडीने मलिकांच्या कोठडीसाठी न्यायालयाकडे १४ दिवसांची कोठडी मागितली होती. यावर निकाल देताना न्यायालयाने नवाब मलिकांना ८ दिवसांची म्हणजेच ३ मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावली आहे. नवाब मलिकांना अटक झाल्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
ही कारवाई सुडबुद्धीने करण्यात आल्याचा आरोप राज्यातील सत्ताधारी नेते करत आहे. यावेळी विरोधी पक्षातील नेते नवाब मलिकांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे. अभिनेत्री क्रांती रेडकरचे पती समीर वानखेडे यांचे नवाब मलिकांसोबत वाद सुरु होते. आता मलिकांना अटक झाल्यानंतर क्रांती यांनी एक ट्विट केले आहे. त्यांनी अप्रत्यक्षपणे नवाब मलिकांवर निशाणा साधला आहे.
क्रांती रेडकर यांनी तान्हाजी चित्रपटातील एक गाणं शेअर केलं आहे. अजय देवगण आणि काजोल यांच्या गाण्यातील हा २८ सेकंदाचा व्हिडिओ आहे. यामध्ये अजय देवगण शत्रु राख में मिले, असे म्हणताना दिसत आहे. सध्या क्रांती रेडकरांचे हे ट्विट सोशल मीडियावर खुप व्हायरल होत आहे.
One my most favourite songs. JAI MAI BHAVANI 🙏🙏🙏 आप सब का दिन शुभ रहे । pic.twitter.com/JhJfuIaoxf
— KRANTI REDKAR WANKHEDE (@KrantiRedkar) February 23, 2022
वन ऑफ माय फेव्हरेट साँग, जय माय भवानी, आप सब का दिन शुभ हो असे क्रांतीने कॅप्शनमध्ये म्हटले आहे. विशेष म्हणजे २० फेब्रुवारी रोजी त्यांच्या अकाऊंटवरुन एक ट्विट करण्यात आलं होतं. तेव्हा क्रांती रेडकर यांच्या ट्विटवर अनेकांनी ईडीसंबंधीत कमेंट केल्या होत्या.
दरम्यान, नवाब मलिकांना अटक केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्त्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी सोशल मीडियावरही अनेक कार्यकर्ते नवाब मलिकांच्या समर्थनार्थ उतरले आहे, तर भाजप नेत्यांनी ईडीच्या कारवाईला योग्य असल्याचे म्हटले आहे. तसेच नवाब मलिकांनी आता राजीनामा द्यावा, अशी मागणीही भाजप नेते करत आहे.
महत्वाच्या बातम्या-
देशमुख-मलिकांनंतर तुरुंगात जाण्यासाठी ठाकरे सरकारमधील ‘डर्टी डझन’ रांगेत; पहा कोण आहेत ‘ते’ १२ जण
किंग खानचा मुलगा करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण, पण अभिनयाच्या ऐवजी करणार ‘हे’ काम
महाविद्यालयीन विद्यार्थ्याने संपवले जीवन; सुसाईड नोटमधून धक्कादायक कारण आलं समोर