एकेकाळी शिवसेनेचे कट्टर समर्थक असणारे नेते आणि आमदार तसेच एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यामुळे राज्याचे राजकारण सध्या तापलेले आहे. शिंदे गटासोबत शिवसेनेचे ५४ पैकी ३८ आमदार असल्याने शिवसेनेच्या गोटात खळबळ उडालेली आहे. लवकरच शिंदे गट महाविकास आघाडीचा पाठिंबा काढून घेऊ शकतो.
असं जर झालं तर शिंदे गट भाजपसोबत सत्तास्थापन करण्याची तयारी करू शकतो. या सगळ्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार कोसळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. या सगळ्या चाललेल्या गोंधळामुळं शिवसैनिक बंडखोर आमदारांवर आक्रमक झाले आहेत.
राज्यभरात आंदोलने सुरू आहेत. जे आमदार शिंदे गटात सामिल झाले आहेत त्यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे आणि त्यांच्या फोटोंवर काळं फासण्यात आलं आहे. आता या प्रकरणात क्रांती मोर्चाने उडी घेतली आहे. मराठा क्रांती मोर्चाने तोडफोड करणाऱ्या शिवसैनिकांना इशाला दिला आहे.
मराठा नेत्यांना टार्गेट करू नका, त्यांच्या कार्यालयाची तोडफोड कराल तर झेंडे काढून दांडे हातात घेऊ असा इशारा त्यांनी दिला आहे. बंडखोर आमदार तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली होती त्यानंतर क्रांती मोर्चाने आक्रमक पावित्रा घेतला आहे.
क्रांती मोर्चाचे नेते आबासाहेब पाटील म्हणाले की, कोणीही मराठा समाजातील नेत्यांना टार्गेट करू नये. आम्ही एकनाथ शिंदे आणि तानाजी सावंत यांच्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करतो. ही तोडफोड थांबवण्यात यावी. अन्यथा आम्ही झेंडे काढून दांडे हातात घेऊ, असा इशारा त्यांनी दिला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून शिंदे गटाला ज्या आमदारांनी पाठिंबा दिला आहे त्यांच्याविरोधान निदर्शने चालू आहेत. शिवसैनिकांनी अनेक ठिकाणी त्यांच्या फोटोवर काळं फासलं आहे तर अनेक आमदारांच्या, नेत्यांच्या कार्यालयाची तोडफोड केली आहे. तर दुसरीकडे २४ तासात या बंडखोरांची मंत्रीपद जातील तसेच काही बंडखोर आमदार आमच्या संपर्कात आहेत असा दावाही संजय राऊत यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
संजय राऊतांनी केलं चक्क नारायण राणेंचं कौतुक, म्हणाले, ‘त्या गोष्टीत मी राणेंना मानतो’
गुवाहाटीतून ४० आमदारांचे मृतदेह येतील; संजय राऊतांच्या वक्तव्याने उडाली खळबळ
शिंदेंच्या बंडामागे भाजपचा हात असल्याचे झाले स्पष्ट, धक्कादायक माहिती आली समोर