राज्यात महिला अत्याचाऱ्यांच्या धक्कादायक घटना घडत आहे. अनेक बलात्काराच्या घटना राज्यातून समोर येत असतात, असे असतानाच आता कोल्हापूरातून एक घृणास्पद प्रकार समोर आला आहे. कोल्हापूरात काही शिकाऱ्यांनी एका घोरपडीवर बलात्कार केल्याचे समोर आले आहे. (kokan mans rape bengol monitor lizard)
संबंधित घटना कोल्हापूराच्या गोठणेजवळ घडली आहे. सहाद्री वाघ्रप्रकल्पात चार शिकाऱ्यांनी घोरपडीवर बलात्कार केला आहे. आता पोलिसांनी याप्रकरणी आरोपींना अटक केली आहे. विनापरवाना शस्त्रांसह वाघ्रप्रकल्पात घुसल्यानंतर अटकेची कारवाई केली होती. त्यानंतर हा सर्वप्रकार समोर आला आहे.
आरोपींनी बलात्काराचे व्हिडिओ त्यांचे मोबाईलमध्ये काढले होते. त्यांचा मोबाईल तपासल्यानंतर शिकाऱ्यांचे हे विकृत कृत्य उघडकीस आले आहे. चांदोली वनपरीक्षेत्रातील गोठणे नियतक्षेत्रात शिकार करण्याच्या उद्देशाने हे शिकारी आत गेले होते.
अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव संदीप तुकाराम, मंगेश पवार, दनार्दन कामटेकर आणि अक्षय सुनील आहे. विनापरवाना शस्त्रांसह आत गेल्याने वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी त्यांचा मोबाईल तपासला असता हे सर्व समोर आले आहे.
वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सीसीटीव्हीच्या साहाय्याने बघितले होते की आरोपी जंगलात फिरत आहे. त्यानंतर वन अधिकाऱ्यांनी त्यांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे आरोपी कोकणातून कोल्हापूरच्या चांदोली गावात शिकारीसाठी आले होते.
दरम्यान, या आरोपींना कोणत्या कलमांखाली कारवाई करावी, यासाठी वन विभागाचे अधिकारी चर्चा करत आहे. तसेच दोषी आढळ्यास त्या आरोपींना सात वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो. आरोपींना कोर्टात हजर केल्यानंतर त्यांना सध्या वन कोठडी सुनावण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या-
हार्दिक पांड्यामुळे गेली ‘या’ चाहत्याची नोकरी? आपल्या कृतीवर आता होत असेल पश्चाताप
ईशान किशनने केली अंबानींची फसवणूक, मुंबईच्या पराभवानंतर संतापले चाहते, पडला मीम्सचा पाऊस
रणबीर-आलियाच्या रिसेप्शनचं ठिकाण बदललं, ताज हॉटेलमध्ये नाही तर ‘या’ ठिकाणी होणार लग्नाची पार्टी