Share

तीन कोब्रांना एकाचवेळी हाताळत होता तरुण अन्…; पहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ

सोशल मीडिया रोज लाखो व्हिडिओ अपलोड होत असतात. त्यातले काही व्हिडिओ हे सोशल मीडियावर खुप व्हायरल होत असतात. त्यामुळे सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी काही लोक काहीही करायला तयार होतात. असेच काहीसे करणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. (kobra and boy viral video)

प्रसिद्ध होण्यासाठी एक तरुण एक स्टंट करत होता, पण तो स्टंट त्याला चांगलाच महागात पडला आहे. तो तरुण तीन धोकादायक कोब्रांशी खेळता होता. पण त्याचवेळी एका सापाने त्याच्यावर हल्ला केला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तसेच व्हिडिओसाठी कोणी आपल्या जीवाशी कसं खेळू शकतं? असा प्रश्न लोकांना पडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, व्हायरल झालेला व्हिडिओ कर्नाटकचा आहे. यामध्ये एक तरुण एक स्टंट करताना दिसत आहे. तो एकाच वेळी एक-दोन नव्हे तर तीन किंग कोब्रांसोबत खेळताना दिसत आहे. पण व्हिडिओचा शेवट खूपच भयानक असल्याचे दिसून येते.

व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या तरुणाचे नाव मेजर सय्यद असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये सय्यद तीन किंग कोब्रांसोबत व्हिडिओ शूट करताना दिसत आहे. तो तिन्ही किंग कोब्रांवर एकाचवेळी नियंत्रण मिळवायला पाहत होता. पण त्याला तसे करणे चांगलेच महागात पडलेले दिसून येते.

https://twitter.com/susantananda3/status/1504098801656934403?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1504098801656934403%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news18.com%2Fnews%2Fnation%2Fmans-stunt-with-three-dangerous-king-cobras-hospitalized-see-viral-video-4075991.html

सय्यद तीन कोब्रा सापांना एका रेषेत बसवतो असे व्हिडिओमध्ये दिसत आहे. यानंतर तो सर्वात लहान सापाची शेपटी पकडतो आणि त्याला त्याच्याकडे खेचतो आणि त्याच्या शेपटीला दाबतो. त्यानंतर तो आपले हात आणि पाय हलवतो. जणू तो सापांना स्वतःचे अनुकरण करण्यास सांगत आहे.

सय्यद दुसऱ्या कोब्राला पकडण्याचा प्रयत्न करतो. पण त्यावेळी साप त्याच्या हातात येत नाही. असे असतानाच सर्वात मोठा कोब्रा त्याच्या पायावर हल्ला करतो. सय्यद त्याला हाताने पकडतो आणि सोडवण्याचा प्रयत्न करतो, पण तो कोब्रा त्याला काही सोडत नाही, असे व्हिडिओमध्ये दिसून येते.

महत्वाच्या बातम्या-
अमेरिकेत बसून मुलाने वाचवला वडिलांचा जीव, Live व्हिडिओ मध्ये मारहाण होताना पाहिलं अन्…
भयानक! हँडसम दिसण्यामुळे तरुणाचा गेला जीव, ८०० किलोमीटवरुन बाईकवरुन आला आरोपी अन् घेतला जीव
अभिनय आणि आईची जबाबदारी सांभाळता येईना, अनु्ष्का शर्माने घेतला मोठा निर्णय, पोस्ट शेअर करत म्हणाली..

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now