भाजपसोबत सरकार स्थापन करताना शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रिपद मिळेल अशी चर्चा होती. मात्र देवेंद्र फडणवीसांनी शिंदे हे मुख्यमंत्री असतील, अशी घोषणा केली. स्व: ता फडणवीस यांनी हे स्पष्ट केलं की, शिंदेंच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होतील.
फडणवीस स्व: ता मंत्रिमंडळातून बाहेर राहणार आहेत. या सरकारमध्ये शिंदे गट आणि भाजपाचे मंत्री सहभागी असतील असं त्यांनी यावेळी सांगितलं आहे. शिंदेंना मुख्यमंत्रिपदी बसवून देवेंद्र फडणवीसांनी मोठेपणा दाखवला. मात्र शिंदेंकडे मुख्यमंत्रिपद देण्यामागे ४ कारणे असल्याच बोललं जातं आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा फडणवीसच मुख्यमंत्री होणार असं चित्र गडद दिसत होते. मात्र कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्तास्थापन करून उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांना २०१९ ला मुख्यमंत्री होण्यापासून रोखलं होतं. त्याचाच वचपा काढण्यासाठी आता उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदावरून खाली खेचण्याची किमया भाजपने केली आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तांतर झालं. अन् शिवसेनेच्या मदतीने विरोधी पक्षात असणारे राष्ट्रवादी – कॉंग्रेस हे दोन्हीही पक्ष पुन्हा सत्तेत आले. त्यामुळे दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांना पुन्हा सत्तेचा ऑक्सिजन मिळाला. मात्र आता भाजपने डाव साधत राष्ट्रवादी – कॉंग्रेस पक्षाला पुन्हा एकदा विरोधी पक्षात बसवलं आहे.
शिवसेनेच्याच जवळच्या नेत्यांनी बंडखोरी केल्याने अखेर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. या सर्व राजकीय घडामोडींमुळे उद्धव ठाकरे यांच्याविषयी सहानुभूती निर्माण होत होती. तर दुसरीकडे, शिंदे यांना मुख्यमंत्री करत आम्हाला मुख्यमंत्रिपदाची हाव नसल्याचा मेसेज भाजपकडून करण्यात आला आहे.
मात्र मुख्यमंत्री पद भाजपने शिंदे यांना दिलं असलं तरी देखील विधानसभेत १०६ जागा असणाऱ्या भाजपला सत्तेत महत्त्वाचा वाटा मिळणार असल्याच चित्र स्पष्टच दिसतं आहे. मुख्यमंत्रीपद नसले तरी अनेक महत्त्वाची खाती भाजप आपल्याकडे ठेवण्याची शक्यता आहे. यामुळे भाजपला चांगलाच फायदा होणार असल्याच बोललं जातं आहे.
महत्वाच्या बातम्या-
मराठा समाजासाठी आनंदाची बातमी! आरक्षणासंदर्भात ठाकरे कॅबिनेटने घेतला मोठा निर्णय
कालीन भैयाच्या सुनेनं बिकीनी घालून पाण्यात लावली आग, फोटो पाहून तुमचेही उडतील होश
आतापर्यंत जगापासून लपलेले आहे कामाख्या मंदिराचे ‘हे’ रहस्य, वाचून तुम्हालाही बसणार नाही विश्वास
उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का! पुण्यातील ‘हा’ माजी मंत्रीही होणार शिंदे गटात सामील