narendra modi : आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 72वा वाढदिवस..! कायमच देशाचे पंतप्रधान मोदी हे अनेक कारणांनी चर्चेत असतात. मोदींचे दौरे, बैठका विशेष बाब म्हणजे, मोदींचे पोशाख नेहमीच चर्चेचा विषय बनतात. आज त्यांचा वाढदिवस सोशल मिडियाच्या माध्यमातून मोदींवर शुभेच्छांचा पाऊस पडत आहे.
विरोधकांनी देखील मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. जगभरातून पंतप्रधान मोदींवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अगदी सर्वसामान्य नागरिक देखील पंतप्रधान मोदींचा फॅन आहे. मात्र त्यांना मोदींना विश करता येतं नाही. आता चिंता करण्याच कारण नाहीये.
आम्ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आलो आहे. या माध्यमातून तुम्ही देखील अगदी सोप्या पद्धतीने पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता. मिळालेल्या महितीनुसार, NaMo या अॅपच्या माध्यमाने तुम्ही थेट मोदींना मेसेज, व्हिडिओ अथवा फोटो पाठवून वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता.
जाणून घ्या सविस्तर..!
NaMo या अॅप बरोबरच Gift of Seva या माध्यमाने देखील तुम्ही पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता. मिळालेल्या महितीनुसार, नमो अॅपच्या माध्यमाने आपण आपला व्हिडिओ रेकॉर्ड करून पंतप्रधान मोदींना विश करू शकता. याशिवाय संपूर्ण कुटुंबाकडून देखील तुम्ही शुभेच्छा देऊ शकता.
वाचा नेमकं कसं..! Gift of Seva यामध्ये आपण e-card बनवून, त्यात आपल्या संपूर्ण कुटुंबाचा समावेश करू शकता. शुभेच्छाचा मेसेज लिहून तुम्ही पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता. एवढच नाही तर, ‘Gift of Seva’ या नव्या फीचरच्या माध्यमाने युजर्स संकल्प करू शकतात.
दरम्यान. Blood Donation, Leading Digital, TB Mukt Bharat, Swachh Bharat, इ, यांपैकी कुठल्याही पद्धतीचा संकल्प करू शकतात. तर आता आम्ही सांगितलेल्या माध्यमातून तुम्ही पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता. कोणताही वेळ न घालवता तुम्हीही पटकन पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या.
महत्वाच्या बातम्या
Toll: बापरे! समृद्धी महामार्गावर टोल भरताना वाहनचालकांचे कंबरडे मोडणार, टोलची रक्कम ऐकून डोळे फिरतील
Shinde Group : शिंदे गटात जाताच प्रताप सरनाईकांना ईडीचा मोठा दिलासा; लवकरच केसही बंद होणार?
बायका परपुरूषांच्या संपर्कात येतील म्हणून ‘या’ पुरग्रस्त गावातील लोक घर सोडायला नाहीत तयार
amruta fadnavis : “ठाकरे सरकारमुळेच वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रात येऊ शकला नाही”: अमृता फडणवीस