भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्ध तीन एकदिवसीय सामने जिंकून या मालिकेवर कब्जा केला आहे. आता यानंतर भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. जी कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळवली जाणार आहे. पण याआधी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. (kl rahul and axar patel left t 20 series)
भारतीय संघाचा स्टार फलंदाज केएल राहुल आणि अष्टपैलू अक्षर पटेल या मालिकेतून बाहेर होणार आहेत. खरेतर, वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातून परतलेल्या केएल राहुलला क्षेत्ररक्षणादरम्यान डाव्या बाजूच्या खांद्याच्या भागामध्ये ताण आला होता, त्यामुळे राहुल टी-२० मालिकेतून बाहेर झाला आहे.
तसेच अक्षर पटेलला वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती आणि आता कोविडमधून बरे झाल्यानंतर त्याच्या पुनर्वसनाचा शेवटचा टप्पा सुरू झाला आहे. त्यामुळे या खेळाडूला वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेलाही मुकावे लागणार आहे.
दरम्यान, भारताने वेस्ट इंडिजविरुद्धची तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका जिंकली आहे. आता कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. ही मालिका स्टेडियममध्ये ७५ टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीत खेळवली जाणार आहे. १६ फेब्रुवारीपासून टी-२० मालिका सुरू होणार आहे.
टी २० सिरीजसाठी खालील खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. रोहित शर्मा, ऋतुराज गायकवाड, ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दूल ठाकूर, रवी बिश्नोई, दीपक हुड्डा, युझवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल या खेळाडूंना संघात घेण्यात आले आहे.
दरम्यान, एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने पहिल्यांदा वेस्टइंडीजला क्लीन स्वीप दिला आहे. वेस्टइंडीजने भारताला दोनदा क्लीन स्वीप दिला आहे. भारताला २०१९ मध्ये देखील एक संधी होती, जेव्हा वेस्टइंडीजने भारताच्या दौऱ्यावर एकदिवसीय सामना जिंकला नाही, पण तरीही भारतीय संघ त्यांनी क्लीन स्वीप देऊ शकला नव्हता. तेव्हा मालिकेतील दोन सामने भारताने आणि एक सामना अनिर्णयित ठरला होता.
महत्वाच्या बातम्या-
एकेकाळी आयपीएल गाजवणाऱ्या ‘या’ स्टार खेळाडूला कोणीच नाही दिला भाव, कारकीर्द संपुष्टात
सागर कारंडे ‘चला हवा येऊ द्या’ शोमधून पडला बाहेर? धक्कादायक खुलाश्याने मनोरंजन क्षेत्रात खळबळ
श्रेयस अय्यर झाला मालामाल, केकेआरने खरेदी केले १२.२५ कोटींमध्ये; डोक्यावर सजणार कर्णधारपदाचा मुकूट