Share

..अन्यथा भाजपची अवस्था शिवसेनेसारखीच होईल, बंडखोर आमदार सोमय्यांवर बरसला

kirit sommiya

राज्यात अडीच वर्षातच ठाकरे सरकारला सत्तेतून पाय उतार व्हावं लागलं आहे. अडीच वर्ष सुरुळीत सुरू असलेलं ठाकरे सरकार अचानक कोसळलं. त्यामागील प्रमुख कारण म्हणजे शिवसेना नेते आणि उद्धव ठाकरेंच्या जवळचे व्यक्ती म्हणून ओळखळे जाणारे एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळे..!

अखेर राज्यात शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झालं आहे. मात्र बंडखोर आमदारांकडून सातत्याने सांगण्यात येत आहे की, ‘आम्ही आजही शिवसेनेतच आहोत.’ याचबरोबर ठाकरे आणि शिवसेनेबद्दल टिका सहन केली जाणार नसल्याचंही शिंदे गटातील नेत्यांनी ठणकावून सांगितलं आहे.

मात्र तरी देखील भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंविरोधात एक व्यक्तव्य केलं. ‘माफिया मुख्यमंत्रीना हटवल्याबद्दल अभिनंदन,’ असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटलं होतं. सोमय्या यांनी केलेल्या टीकेमुळे शिंदे गट नाराज झाला. याचाच धागा पकडत शिंदे गटातील आमदार किशोर पाटील यांनी भाष्य केलं आहे.

पाटील यांनी म्हंटलं आहे की, ‘शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यामुळे शिवसेनेची आज ही अवस्था झाली आहे. शिवसेनेसारखी भाजपची अवस्था होऊ द्यायची नसेल तर किरीट सोमय्यांना आवरलं पाहिजे, असं किशोर पाटील यांनी स्पष्टचं सांगितलं आहे.

तसेच पुढे बोलताना किशोर पाटील यांनी भाजपला इशारा दिला आहे. आजही ठाकरे परिवार आमचं दैवत असून पुन्हा आम्हाला काही दुसरा विचार करायला भाग पाडू नका, असं पाटील यांनी म्हंटलं आहे. ‘सोमय्या हे सतत ठाकरे परिवारावर टीका करत आहेत. यामुळे पक्षाने त्यांना सांभाळलं पाहिजे,’ असं त्यांनी म्हंटलं आहे.

दरम्यान, सोमय्या यांनी केलेल्या व्यक्तव्याबद्दल शिंदे गटाने थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे. सोमय्या यांनी केलेल्या व्यक्तव्याबाबत फडणवीसांना आक्षेप कळविला आहे. त्यांना सोमय्यांना आवर घालण्यास सांगितले आहे. आमच्यात जे काही ठरले आहे, त्यानुसार भाजपा नेत्यांनी वागावे, असे फडणवीसांना सांगितले असल्याचे केसरकर म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या
शिंदे गटाला समर्थन देणं तानाजी सावंतांना भोवलं, उद्धव ठाकरेंनी केली मोठी कारवाई
मला आपल्याशी बोलायचंय.., उद्धव ठाकरेंसोबत असलेल्या एकमेव अपक्ष माजी मंत्र्याने दिले आमंत्रण
रामचरणच्या पत्नीने आई न होण्याचा निर्णय घेतल्यानंतर अध्यात्मिक गुरू म्हणाले, मानव ही लुप्त होणारी किंवा..
राज्यात भाजपच सरकार येताच भाजप आमदाराच्या घरासमोर सापडलं मोठं घबाड; प्रकरण वाचून हादरल

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now