राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. एकेकाळी सोबत असणारे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. सध्या शिवसेनेत दोन गट पडले आहेत. अशातच ‘मी स्वतःला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री समजतो,’ असं बंडखोर आमदाराने म्हंटलं आहे.
बंडखोर आमदाराच्या या व्यक्तव्याने राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत. विशेष बाब म्हणजे, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोरच या आमदाराने हे व्यक्तव्य केल्याने खळबळ उडाली आहे. वाचा नेमकं काय म्हंटल आहे या बंडखोर आमदाराने?
त्याचं झालं असं, एकनाथ शिंदे यांची राज्याच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याने शिंदे गटाचे आमदार किशोर अप्पा पाटील यांनी मुंबईत त्यांच्या सत्काराचा जाहीर कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमात भाषण करताना मुख्यमंत्री शिंदे यांनी मी मुख्यमंत्री झालोय यावर विश्वासच बसत नाही, असं विधान केलं.
तर दुसरीकडे किशोर अप्पा पाटील यांनी एकनाथ शिंदेंच्या व्यक्तव्याआधी आपण स्वत:ला महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री समजतो, असं विधान केलं. यामुळे आता राज्याच्या राजकारणात उलटसुलट चर्चाना उधाण आलं आहे. यावेळी बोलताना जवळचा माणूस म्हणून मला मंत्रिपद देणार असाल तर मला अजिबात पटणार नाही असं पाटील म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले, ‘माझ्या कर्तृत्वावर मंत्रिपद देणार असाल तर त्याचं स्वागत आहे. राज्यमंत्र्यांचे गेल्या अडीच वर्षात हाल झाले, असं देखील त्यांनी म्हंटलं. याचबरोबर यावेळी पाटील यांनी अब्दुल सत्तारांकडे बोट दाखवत सत्तार साहेब तलाठी ऑफिसरची बदलीही करू शकले नाहीत, असं व्यक्तव्य केलं.
दरम्यान, पुढे बोलताना त्यांनी म्हंटलं आहे की, “अरे मंत्रिपद काय घ्यायचं, मी स्वतःला या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री समजतो”, याचबरोबर मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हंटलं आहे की, एक-एक कार्यकर्ता स्वतःला मुख्यमंत्री समजू लागला हे चित्र पहिल्यांदाच राज्यात दिसलं. हे राज्य सर्वांचं आहे. आम्ही बाळासाहेंबांचं हिंदुत्व, दिघे साहेबांचे विचार घेऊन पुढे चाललो आहोत, असं त्यांनी नमूद केलं.
महत्वाच्या बातम्या-
सुष्मितासोबतच्या नात्यामुळे ट्रोल करणाऱ्यांना ललित मोदींनी सुनावले; म्हणाले, मी अजूनही मध्यम वयात…
शिंदे सरकारची घटीका भरली? सर्वोच्च न्यायालय ‘या’ तारखेला ठरवणार शिंदे सरकारचे भवितव्य
नगरच्या पठ्ठ्याच्या ‘या’ जुगाडावर आनंद महिंद्रा सुद्धा झाले फिदा; फोल्डिंग जिना पाहून म्हणाले…