सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सगळेच जण सोशल मीडियावर सक्रिय असतात. असे मानले जाते की नाव आणि प्रसिद्धी मिळविण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे. असेच काहीसे केरळच्या रस्त्यांवर आणि जत्रेत फुगे विकणाऱ्या किसबू नावाच्या मुलीसोबत घडले. (kisbu keral model)
किसबू सध्या सोशल मीडिया चांगलीच चर्चेत आहे. तिचे व्हायरल होत असलेले फोटो पाहून कोणाचाही त्यावर विश्वास बसत ही की ती एक फुगे विकणारी मुलगी आहे. फोटोग्राफरने तिचे काही फोटो क्लिक केले होते, ज्यापैकी त्याने तिचा एक फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केला.
त्या पोस्टला मिळालेला प्रतिसाद पाहून तो स्वतःही थक्क झाला. किसबूचा फुगे विकण्याचा फोटो चांगलाच व्हायरल झाला. फोटोग्राफरने एनडीटीव्हीला सांगितले की, त्याने १७ जानेवारी रोजी अंदलूर कावू महोत्सवात किसबुला फुगे विकताना पाहिले होते. तिच्या सुंदर लूकने त्याला प्रभावित केले आणि त्यामुळे त्याने तिचे फोटो क्लिक केले.
जेव्हा मी तिचे काही फोटो क्लिक केले तेव्हा ती आणि तिची आई माझ्याकडे आले आणि फोटो पाहू लागले. ते एकदम खुश होते. त्यानंतर फोटोग्राफरने हे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले. फोटो व्हायरल झाले, त्यामुळे तो फोटोग्राफर पुन्हा किसबूच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आला.
फोटोग्राफरने किसबूला नवीन लुकमध्ये फोटोशूट करण्यासाठी मनवले. त्यानंतर किसबूला मेकओव्हर करुन तिला तयार करण्यात आले. मेकअप आर्टिस्ट रेम्या प्राजुल फोटोशूटसाठी किसबूची तयारी करत होती. रेम्याने सांगितले की, किसबूचा मेकओव्हर पहाटे ४ वाजता सुरू झाला, ज्यामध्ये तिचे मॅनिक्युअर, पेडीक्युअर आणि फेशियल करण्यात आले. या दरम्यान ती ओव्हर मेकअप दिसणार नाही, याची देखील काळजी घेण्यात आली.
फोटोशूट दरम्यान, किसबूने पारंपारिक कासवू साडी आणि सोन्याचे दागिने घातले होते. फोटोग्राफरने या शूटचे अनेक फोटो आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. किसबूचे हे फोटो चांगलेच व्हायरल झाले असून अनेकांनी या फोटोला प्रतिसाद दिला आहे. व्हायरल झालेल्या फोटोमुळे ती एका रात्रीत स्टार झाली आहे.
महत्वाच्या बातम्या-
समंथा ठरली साऊथ इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणारी दुसरी अभिनेत्री; मानधन ऐकून डोळे पांढरे होतील
IPL 2022: लसिथ मलिंगाने मुंबई इंडियन्सला केले टाटा-बाय; आता ‘या’ संघाला गोलंदाजी शिकवणार
टाटाची ‘ब्लॅकबर्ड’ कार लवकरच होणार लॉन्च, नेक्सॉनपेक्षाही दमदार, वाचा फिचर्स आणि किंमत