प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज हे नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे नेहमीच चर्चेत येत असतात. सोशल मीडियावर त्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यांचे कीर्तन नेहमी चर्चेचा विषय ठरत असते. पण आता त्यांच्याबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. (kirtankar indurikar maharaj cancelled kirtan)
इंदुरीकर महाराज यांची प्रकृती ठीक नाहीये. त्यामुळे ३० मेपर्यंतचे सर्व कीर्तनाचे कार्यक्रम त्यांनी रद्द केले आहे. २३ मे ते ३० मेपर्यंतचे सर्व नियोजित कार्यक्रम त्यांनी रद्द केले आहे. कार्यक्रम रद्द केल्याबद्दल इंदुरीकर महाराज यांनी दिलगिरीही व्यक्त केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इंदुरीकर महाराजांना किडनी स्टोनचा त्रास आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहे. या आजारावर संगमनेर येथील हॉस्पिटलमध्ये इंदुरीकर महाराजांवर हायट्रो थेरेपी केली जाणार आहे. त्यामुळे डॉक्टरांनी सध्या त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे.
वैद्यकीय सेवेनंतर पुन्हा आपल्या सेवेत पुर्वनियोजित कार्यक्रम पाडतील. आपल्या सर्वांचे आशिर्वाद पाठिशी आहेत. असेच प्रेम कायम लाभावे ही अपेक्षा. सहकार्याबद्दल धन्यवाद, असे इंदुरीकर महाराजांनी म्हटले आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती ठीक झाल्यानंतर पुन्हा ते कीर्तनाला सुरुवात करणार आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच इंदुरीकर महाराजांचा कार अपघात झाला होता. जालन्यात त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला होता.रात्री दहा वाजेच्या सुमारास परतूरमध्ये असताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला होता. सुदैवाने या अपघातातून इंदुरीकर महाराज थोडक्यात बचावले होते.
इंदुरीकर महाराज त्यांच्या कारने परतूरच्या खांडवीवाडी येथे जात होते. त्यावेळी इंदुरीकर महाराजांच्या स्कॉर्पियोला एका ट्रॅक्टरने धडक दिली होती. या अपघातात गाडीचे मोठे नुकसान झाले होते. तसेच ज्यावेळी तिथल्या स्थानिकांना याबाबत माहिती मिळाली, त्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या अपघातात इंदुरीकर महाराज जखमी झाले नव्हते, पण त्यांचा चालक जखमी झाला होता.
महत्वाच्या बातम्या-
जितू भैयाने ‘पंचायत २’ च्या एका एपिसोडसाठी घेतले तब्बल ‘एवढे’ मानधन, जाणून घ्या वार्षिक कमाई
‘आता उद्धव ठाकरे, अजित पवार आणि बाळासाहेब थोरातांच्या थेट घरात घुसणार’
पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी भ्रष्टाचारी मंत्र्याची हकालपट्टी करताच केजरीवालांना अश्रू अनावर; म्हणाले…