गेल्या आठ ते दहा दिवसांपासून राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे अखेर ठाकरे सरकार कोसळले आहे. तसेच एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत हात मिळवणी करुन नवीन सरकार स्थापन केले आहे. (kirit somaiyya shocking statement on devendra fadanvis)
गुरुवारी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्यामुळे सध्या सगळीकडे हा चर्चेचा विषय ठरला आहे.
भाजपचे १०५ आमदार असतानाही देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यामुळे सगळेच हैराण आहे. अनेक नेतेही यावर प्रतिक्रिया देताना दिसून येत आहे. अनेकांनी फडणवीसांवर अन्याय झाल्याचं म्हटलं आहे. आता किरीट सोमय्या यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.
उपमुख्यमंत्रिपद मिळाल्यामुळे देवेंद्र फडणवीस नाराज असल्याच्या चर्चांवर किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, पार्टी आणि महाराष्ट्र महत्वाचं आहे. त्यामुळे मान-अपमान बाजूला ठेवत फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपद स्विकारलं आहे.
नवं सरकार येताच देवेंद्र फडणवीस यांनी पहिला निर्णय मेट्रोचा घेतला आहे. मेट्रो कारशेड आरेमध्येच होणार आहे. पर्यावरणाच्या नावाखाली ठाकरेंनी मेट्रोची अडीच वर्षे वाट लावली. आता मेट्रो पुन्हा रुळावर आणण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे, असेही किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे
उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी माफियागिरी केली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचा त्यांचा डाव होता. तो कोर्टाने हाणून पाडला आहे. संजय राऊतांनी भ्रष्टाचार केला. त्यांची चौकशी होणार आणि कारवाई होणार, असेही किरीट सोमय्यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
..अन् त्यांनी रिक्षातच आईच्या कुशीत जीव सोडला, वडिलांच्या निधनानंतर मराठी अभिनेता भावूक
धक्कादायक! मुलीनेच केला मुलीवर बलात्कार; मोबाईलवर व्हिडीओही बनवला आणि नंतर…