शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. सेव्ह विक्रांत या मोहिमेअंतर्गत किरीट सोमय्या यांनी घोटाळा केला आहे, असा आरोप संजय राऊतांनी केला आहे. या प्रकरणी किरीट सोमय्या आणि त्यांचे चिरंजीव नील सोमय्या यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (kirit somaiyya letter viral)
या प्रकरणी किरीट सोमय्यांनी ५८ कोटींचा घोटाळा केला होता, असा आरोप संजय राऊतांनी केला आहे. पण असे असतानाच आता एक पत्र व्हायरल होत आहे. त्यानुसार, सेव्ह विक्रांत या मोहिमेतून ११ हजार २२४ रुपयांचा निधी जमा झाल्याची माहिती किरीट सोमय्यांनी राज्यपालांना दिली होती.
हे पत्र व्हायरल झाल्यानंतर त्यामध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे की किती निधी जमा झाला आहे. त्यामुळे संजय राऊतांनी केलेला ५८ कोटींचा दावा खोटा असल्याचे म्हटले जात आहे. त्यावर आता संजय राऊत काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
किरीट सोमय्या यांचं हे पत्र २०१३ चं आहे. तत्कालीन राज्यपाल शंकर नारायण यांना त्यांनी हे पत्र लिहिलं होतं. या पत्रावर सोमय्यांची सही देखील आहे. चर्चगेट रेल्वे स्टेशनवर ११ हजार २२४ रुपयांचा निधी जमा झाल्याची माहिती सोमय्या यांनी दिली आहे. त्यामुळे संजय राऊतांचा हा आरोप खरा की खोटा? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, आयएनएस भंगारात काढण्याविरोधात किरीट सोमय्यांनी आंदोलन केले होते. विक्रांतला वाचवण्यासाठी त्यांनी लोकांकडून निधी जमा केला होता. मुंबईमध्ये सोमय्यांनी अनेक लोकांकडून निधी जमवला होता. ५८ कोटी रुपये निधी जमा करण्यात आला होता, असे संजय राऊतांनी म्हटले होते.
तसेच हा निधी राज्यपालांकडे जमा केला जाणार होता, पण हा निधी त्यांनी जमाच केला नाही. त्यांनी सेव्ह विक्रांत मोहिम अंतर्गत ५८ कोटींचा घोटाळा केला असून या भ्रष्टाचाराचे प्रमुख किरीट सोमय्या होते, असे संजय राऊतांनी म्हटले होते. त्यानंतर या प्रकरणी आता किरीट सोमय्या आणि नील सोमय्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या-
‘या’ सरकारी अधिकाऱ्यामुळे पुर्ण जगात खराब झाली बिहारची प्रतिमा, ६० फुटांचा पुलच केला चोरी
आलिया-रणबीरच्या लगीनघाईत समोर आली ऋषी-नीतू कपूरची ४२ वर्षांपुर्वीची पत्रिका, पहा फोटो
VIDEO: लाईव्ह मॅचमध्ये हार्दिक पांड्याने केले ‘असे’ कृत्य, भडकले चाहते, म्हणाले, ‘क्रुणालचाच भाऊ आहे ना’