राज्यातील हनुमान चालिसाचा वाद वाढत चालला आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांनी मातोश्रीवर येऊन हनुमान चालिसा पठणाची घोषणा केली होती. पण दोन दिवसांच्या नाट्यमय घडामोडीनंतर त्यांनी आपला निर्णय मागे घेतला आहे. (kirit somaiyya go to the police station)
अशात नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांनी दोघांना त्यांच्या घरातून अटक केली आहे. त्यांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. राणा दाम्पत्याला अटक केल्यानंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे.
नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर समाजात तेढ निर्माण करणारी विधाने केल्याप्रकरणी अटकेची कारवाई झाली आहे. कलम १५३ (अ) च्या अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राणांच्या मुंबईतल्या घराबाहरे खुप गर्दी होती, पण चोख पोलिस बंदोबस्तात त्यांना खार पोलिस ठाण्यात नेण्यात आले.
पोलिसांनी राणा दाम्पत्याला खार पोलिस ठाण्यात नेत्यातच नवनीत राणा यांनी एक व्हिडिओ जारी केला होता. त्या व्हिडिओमध्ये नवनीत राणा यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मदतीचे आवाहन केले होते.
त्यानंतर शिवसेनेविरोधात सातत्याने आक्रमक भूमिका घेणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आपण पोलिस ठाण्यात दाखल होणार, असे म्हटले होते. मी रात्री ९ वाजता खार पोलिस ठाण्यात जाणार आहे, असे किरीट सोमय्या यांनी ट्विट करुन म्हटले होते.
आमदार आणि खासदारांना हनुमान चालिसेसाठी अटक करणाऱ्या महाराष्ट्रातील रावण राजचा मी निषेध करतो. घोटाळेबाज सरकारचं दहन होण्याची भिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना वाटते. मी रात्री ९ वाजता खार पोलिस ठाण्यात जाणार आहे, असे किरीट सोमय्यांनी ट्विट करुन म्हटले होते.
अशात शनिवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली आहे. भाजप नेते मोहित कंबोजनंतर शिवसैनिकांनी किरीट सोमय्यांवरही हल्ला केला आहे. जेव्हा ते राणा दाम्पत्याला भेटायला गेले, तेव्हा शिवसैनिक खुपच आक्रमक झाल्याचे दिसून आले. त्यांनी किरीट सोमय्यांवरही हल्ला केला होता. त्या हल्ल्यात सोमय्या जखमी झाले आहे. यावेळी शिवसैनिकांनी त्यांची गाडीही फोडली आहे.
महत्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! खार पोलिस स्टेशनबाहेर शिवसैनिकांच्या हल्ल्यात किरीट सोमय्या जखमी, गाडी फोडली
१७ वर्षीय मुलीला गरोदर केल्याप्रकरणी १२ वर्षीय मुलावर गुन्हा, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
सत्तेचा इतका माज? इतकी दंडुकेशाही?, राणा दाम्पत्याच्या अटकेवर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया