Share

सोमय्यांचे सासुरवाडीत ‘स्वागत’ करण्यासाठी शिवसेनेच्या दोन आमदारांची जय्यत तयारी

Kirit-sommya-Uddhav-Thakare.j

सध्या भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. मुरुड तालुक्यातील कोर्लई येथे रश्मी ठाकरे यांचे १९ बंगले आहेत, असा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. (kirit somaiyya at korlai)

आता रश्मी ठाकरे यांचे ते १९ बंगले दाखविण्यासाठी किरीट सोमय्या आज तिथे जाणार आहे. यावरुन रायगडचे शिवसेनेचे दोन आमदार व शिवसैनिक आक्रमक झाले आहे. आमदार महेंद्र दळवी यांनी सोमय्या अलिबागचे जावई असून ते जर उतमात करत असतील तर जावयाला परत पाठवणे अलिबागकरांना येते असा इशारा दिला आहे.

तसेच शिवसेना आमदार भरत गोगावले यांनी सोमय्यांची प्रसिद्धीची नशा उतरवण्यासाठी रायगडचे शिवसैनिक रायगड स्टाईलने उत्तर देतील असा इशारा दिला आहे. त्यामुळे किरीट सोमय्या आता तिथे गेल्यावर नक्की काय होणार? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

मुरुड तालुक्यातील कोर्लई गावात रश्मी ठाकरेंच्या नावावर संपत्ती असून त्यामध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे. तसेच याबद्दल त्यांनी तक्रार देखील दाखल केली आहे. त्यामुळे या तक्रारीचा पाठपुरावा करण्यासाठी ते शुक्रवारी कोर्लई येथे जाणार आहे.

आता किरीट सोमय्या गावात येणार असल्यामुळे त्यांना अडवण्यासाठी शिवसेनेचे तीन आमदार आक्रमक झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्या नाहक बदमानीचा प्रयत्न सोमय्या यांनी केला आहे. त्यामुळे आम्ही गप्प बसणार नाही, असे या आमदारांनी म्हटले आहे.

यासंदर्भात महेंद्र दळवी यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी ते म्हणाले, त्यांना सरपंचांनी योग्य उत्तर दिले आहे. तरी देखील सोमय्या येथे येऊन उतमात करणार असतील. तर एक ते अलिबागचे जावई आहेत. जावयाला परत पाठवणे अलिबागकरांना येते.

महत्वाच्या बातम्या-
वडिलांच्या निधनानंतर भावूक झाली रवीना टंडन, वडिलांसोबतचा जुना फोटो शेअर करत म्हणाली..
‘माझ्या जीवाला धोका आहे’; प्रसिद्ध गायिकेच्या फेसबुक पोस्टने उडाली खळबळ, वाचा संपूर्ण प्रकरण
मालेगावच्या उर्दुघराला कर्नाटकची हिजाब गर्ल मुस्कान खानचे नाव, महापालिकेत बहुमताने ठराव मंजूर

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now