Share

किरीट सोमय्या भडकले; “संजय राऊतांना एवढी मस्ती, गुर्मी आली असेल तर…”

काही दिवसांपूर्वीच भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) पुणे दौऱ्यावर असताना ते पुणे महानगरपालिकेला भेट देणार होते. यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना महापालिकेत जाण्यापासून रोखले. यावेळी धक्काबुक्की देखील झाली. या धक्काबुकीत किरीट सोमय्या पायऱ्यांवर पडले. त्यानंतर राजकारण चांगलच तापलं.

आज पुन्हा एकदा सोमय्या पुण्यात आले आहेत. यावेळी पुणे विमानतळावर सोमय्या यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. ‘महाराष्ट्राच्या जनतेने लोकांच्या जीवाशी खेळण्याचा ठेका उद्धव ठाकरेंना दिला आहे का?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

तसेच पुढे बोलताना ते म्हणाले, “राऊतांना एवढी मस्ती, गुर्मी आहे की मी लोकांचा जीव घेणार. बोगस कंपन्याकंडून कंत्राट घेणार, महाराष्ट्रातील लोकांची हत्या होऊ देणार आणि त्यानंतर काही होणार नाही असं वाटत असेल तर ते मूर्ख आहेत. राऊतांचे मित्र, परिवार, पार्टनर यांच्यावर कारवाई होणारच.”

दरम्यान, पुण्यात झालेल्या हल्लाबाबत बोलताना सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील लक्ष केले. ते म्हणाले, ‘गेल्यावेळी मुख्यमंत्री कार्यालयाने १०० गुंड पाठवले आणि तक्रार होऊ दिली नाही. कारवाई कशी होत नाही, पाहतोच,’ असे म्हणत त्यांनी ठाकरे सरकारविरोधात दंड थोपटले आहेत.

पुढे बोलताना सोमय्या म्हणाले, ठाकरेंनीच हे सगळं घडवून आणलं. पुणे महापालिकेत १०० लोक कसे घुसले? आज इतके पोलीस असताना त्यादिवशी का पळून गेले. एक पोलीस कॅम्पसमध्ये नव्हता. पालिकेत घुसणाऱ्या गुंडांचा व्हिडीओ पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांना दिसत नाही का? असा सवाल देखील त्यांनी केले.

पुणे महापालिकेत आलेल्या किरीट सोमय्याची शिवसैनिकां सोबत धक्काबुक्की झाल्यानंतर राजकिय वर्तुळातील वातावरण चांगलेच तापले आहे. मुख्य म्हणजे याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सात ते आठ शिवसैनिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दुसऱ्या बाजूला सोमय्यांसोबत भाजप नेते देखील ठाकरे सरकारवर निशाणा साधताना दिसत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या
आपल्या सर्वांचा लाडका ‘शक्तिमान’ पुन्हा येणार रुपेरी पडद्यावर, टीझर पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला
रोज फक्त १०० रुपये गुंतवा आणि मिळवा १४ लाख रुपयांचा नफा, ग्रामीण लोकांसाठी पोस्टाची भन्नाट स्कीम
‘तु आई कधी होणार?’ असा प्रश्न विचारणाऱ्या ट्रोलरला सामंथाने दिली थेट बाळंतपणाची तारीख, म्हणाली..
एजाज खानने त्याच्या एक्स गर्लफ्रेंडला दिला धोखा? सर्वांसमोर तिची माफी मागत म्हणाला.

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now