Share

‘तुटून पडा.. हात तोडा, पाय तोडा, जीव गेला तरी चालेल, पण किरीटला गप्प बसवा’

udhav thackeray

दोन दिवसांपूर्वी पुणे महानगर पालिकेच्या पायऱ्यांवर भाजपा नेते किरीट सोमय्या यांना शिवसेना कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की करण्यात आली होती. सोमय्यांना धक्काबुक्की झाल्याच्या प्रकरणावरून भाजपा आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर शाब्दिक युद्ध रंगले आहे.

आज पुन्हा भाजपा नेते किरीट सोमय्या पुणे महानगरपालिकेत आले होते. पुणे शहर भाजपच्या वतीने त्यांचा महापालिकेत सत्कार करण्यात आला. त्यानंतर त्यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी शिवसेनेवर गंभीर आरोप केले.

यावेळी बोलताना ते म्हणाले, माझा आवाज दाबण्यासाठी, आपल्या वरील आरोप उघड होऊ नये, यासाठी माझ्यावर भ्याड हल्ला करण्यात आला. तसेच ‘तुटून पडा.. हात तोडा, पाय तोडा, जीव गेला तरी चालेल, पण किरीटला गप्प बसवा,’ असे आदेश ठाकरेंनी दिले असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

पुढे बोलताना सोमय्या म्हणाले, पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता हे पोलीस आयुक्त नसून ठाकरे-पवारांचे एजंट असल्यासारखे वागतात. शनिवारी मी जेव्हा महापालिका आयुक्तांना भेटण्यासाठी आलो होतो तेव्हा या ठिकाणी पुणे पोलिसांचा एकही कर्मचारी नव्हता. तेव्हा सर्व पोलीस अमिताभ गुप्ता यांनी गायब केले, असे त्यांनी म्हंटले आहे.

पुण्यात झालेल्या हल्लाबाबत बोलताना सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील लक्ष केले. ते म्हणाले, ‘गेल्यावेळी मुख्यमंत्री कार्यालयाने १०० गुंड पाठवले आणि तक्रार होऊ दिली नाही. कारवाई कशी होत नाही, पाहतोच,’ असे म्हणत त्यांनी ठाकरे सरकारविरोधात दंड थोपटले आहेत.

पुढे बोलताना सोमय्या म्हणाले, ठाकरेंनीच हे सगळं घडवून आणलं. पुणे महापालिकेत १०० लोक कसे घुसले? आज इतके पोलीस असताना त्यादिवशी का पळून गेले. एक पोलीस कॅम्पसमध्ये नव्हता. पालिकेत घुसणाऱ्या गुंडांचा व्हिडीओ पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांना दिसत नाही का? असा सवाल देखील त्यांनी केले.

पुणे महापालिकेत आलेल्या किरीट सोमय्याची शिवसैनिकां सोबत धक्काबुक्की झाल्यानंतर राजकिय वर्तुळातील वातावरण चांगलेच तापले आहे. मुख्य म्हणजे याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सात ते आठ शिवसैनिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दुसऱ्या बाजूला सोमय्यांसोबत भाजप नेते देखील ठाकरे सरकारवर निशाणा साधताना दिसत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या
राजस्थानमध्ये बांधली जात आहे जगातील सर्वात मोठी घंटा, ८२ हजार किलोच्या या घंटेचा आवाज ८ किमीपर्यंत येणार
देशातील सगळ्यात अय्याश राजा: महालात नग्न आलं तरच मिळायचा प्रवेश, ३६५ राण्यांसोबत जगायचा लक्झरी लाईफ
‘या’ कार्यक्रमात सिद्धार्थ जाधवसोबत दिसणार दिवंगत रमेश देव यांची शेवटची झलक, पहा व्हिडीओ
रानू मंडल पुन्हा आली चर्चेत, आता पुष्पा चित्रपटातील ‘श्रीवल्ली’ गाण्यावर केला भन्नाट डान्स, पहा व्हिडीओ

इतर राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now