Share

देशमुख-मलिकांनंतर आता अटकेसाठी कोणाचा नंबर? सोमय्या म्हणाले, “शरद पवार आणि उद्धव ठाकरे…”

sharad pawar udhav thackeray

सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. केंद्राकडून तपास यंत्रणाचा गैरवापर सुरु असल्याचा आरोप एकीकडे महाविकास आघाडीमधील नेते करत आहेत, तर दुसरीकडे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीनं अटक केल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधक असा संघर्ष पेटला आहे.

अशातच भाजप नेते किरीट सोमय्यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर हल्लाबोल चढवला आहे. संजय राऊत यांच्या धडपडीवरून लक्षात येतंय की आता कुणाची बारी आहे, असा सूतोवाच सोमय्यांनी केला आहे. याबाबत ते पत्रकार परिषदेदरम्यान बोलत होते.

यावेळी बोलताना ते म्हणाले, पत्रकार विचारतात आता कुणाचा नंबर, पण त्यासाठी चिट्ठी काढावी लागेल. ही चिट्ठी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी काढावी, असा सणसणीत टोला किरीट सोमय्या यांनी लगावला आहे. सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या अटकेनंतर महाविकास आघाडीच्या १२ नेत्यांची नावं जाहीर केली आहेत.

मलिक यांच्यानंतर आणखी बारा जण आहेत, जे जेलमध्ये जातील, असं किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे. या डर्टी डझनमध्ये अनिल देशमुख, नवाब मलिक या दोघांबाबत निर्णय आला. त्यात अनिल परब आहेत आणि त्यांच्यावर आधीच प्रक्रिया सुरू झाली असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

ते पुढे म्हणाले, मी संजय राऊत नाही. किरीट सोमय्याच्या कंपनीच्या एका पार्टनरचे नाव राऊत सांगू शकले नाही. कुठे आहे वाधवान? आम्ही कागदपत्रांसह सांगतो. आता १२ नेत्यांपैकी पुढचा नंबर कोणाचा ही चिट्ठी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना काढू द्या. कोणत्या नेत्याला आधी तुरुंगात पाठवायचे, हे त्यांना ठरवू द्या, असं सोमय्या यांनी म्हंटले.

https://twitter.com/KiritSomaiya/status/1496763567726493696?s=20&t=BrisSY7iP8h-DujrnQxWDg

दरम्यान, सोमय्यांनी जाहीर केलेल्या ‘डर्टी डझन’ यादीमध्ये महाविकास आघाडी सरकरमधील अनिल देशमुख, नवाब मलिक, अनिल परब, संजय राऊत, सुजित पाटकर, भावना गवळी, आनंद आडसुळ, अजित पवार, हसन मुश्रीफ, प्रताप सरनाईक, रविंद्र वायकर, जितेंद्र आव्हाड या नेत्यांची नाव आहेत. तसेच या नेत्यांची यादी घेऊन किरीट सोमय्या आज दिल्लीत जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या
संजय दत्तला ‘त्या’ अवस्थेत बघून श्रीदेवीने त्याला धक्के मारून सेटवरुन हाकलून दिले होते
नवरीच्या कुटुंबीयांनी नवरदेवाच्या पाहुण्यांना कोंडून चोप चोप चोपलं, नवरदेवाला फेकलं रस्त्यावर
भाजप शहराध्यक्षाच्या घरावर पोलिसांनी छापा मारताच उडाली खळबळ, चालू होता जुगाराच अड्डा
साऊथच्या ‘पुष्पा’नंतर पावनखिंड चित्रपटाने रचला इतिहास, हिंदी चित्रपटही पडले फिके

इतर राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now