राज्यात ठाकरे सरकार स्थापन झाल्यापासून भाजपा नेते किरीट सोमय्या हे सातत्याने सत्ताधाऱ्यांकडून सडकून टीका करत आहेत. हे सांगण्याच कारण म्हणजे, सध्या राज्यात सुरू असलेल्या नाट्यमय घडामोडींवरून देखील सोमय्या यांनी पुन्हा थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
‘उद्धव ठाकरे साहेब, आपण मला तोतरा म्हणा, बोबड्या म्हणा, टमरेल म्हणा. आपले प्रवक्ते संजय राऊत यांनी सोमय्यांना भ* म्हणावं, चु* म्हणावं. पण हिशोब तर द्यावाच लागणार. उद्धव ठाकरे साहेब, १९ बंगल्यांचा हिशोब घेतल्याशिवाय किरीट सोमय्या स्वस्थ बसणार नाही,’ असं सोमय्या यांनी म्हंटलं आहे.
भाजपाच्या कार्यकर्त्यांसमोर बोलताना सोमय्या यांनी पुन्हा शिवसेनेला त्याच बरोबर ठाकरे कुटुंबीयांना लक्ष केलं आहे. घाटकोपर येथे आयोजित डॉ. किरीट सोमैया “कार्यकर्ता संवाद” कार्यक्रमात ते बोलत होते. ‘महाराष्ट्रात माफिया राजचा अंत जवळ आला आहे. मुंबई महापालिकेचं माफिया राज पण मुंबईकर संपवणार आहेत,’ असं त्यांनी यावेळी बोलताना म्हंटलं आहे.
याचबरोबर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी ८९७ कोटींचा घोटाळा केल्याचा खळबळजनक आरोप देखील सोमय्या यांनी केला आहे. सोमय्या यांनी केलेल्या आरोपांमुळे आता राजकीय वर्तुळात आणखीनच खळबळ उडाली आहे.
“ठाकरेंनी २८ नोव्हेंबर २०२१ला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर दहिसरमध्ये २९ नोव्हेंबरला २ कोटी ५५ लाखात अल्पेश अजमेरा बिल्डरने जी जागा विकत घेतली होती, ती ठाकरे सरकारने ९०० कोटीत विकत घेतली. मुख्यमंत्र्यांनी अडीच कोटीचे ९०० कोटी दिले. अजमेरा बिल्डरला ८९७ कोटी ५० लाखांचा फायदा करून दिला”, असा आरोप सोमय्यांनी आहे.
दरम्यान, सोमय्यांनी केलेल्या आरोपांवर अद्याप शिवसेना नेत्यांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाहीये. मात्र शिवसेना नेत्यांच्या प्रतिक्रियेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. एकीकडे एकनाथ शिंदे यांनी केलेला बंडाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे सोमय्यांनी केलेल्या आरोपांमुळे शिवसेनेत खळबळ उडाली आहे.