‘मराठीत कोणती डिक्शनरी आहे का ते बघा आणि जेवढ्या शिव्या द्यायच्या आहेत, तेवढ्या एकदाच मला देऊन टाका रोज माझ्या आईला संताप नको,’ असे म्हणत भाजपा नेते खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर पलटवार केला आहे. (kirit somaiya comment on shivsena leader sanjay raut)
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. या भेटीवरून किरीट सोमय्या यांनी टीका केली होती. तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना भेटण्याआधी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची परवानगी घेतली होती का, अशी टीका सोमय्या यांनी केली होती. यावर उत्तर देताना संजय राऊतांनी अपशब्दाचा वापर केला.
राऊत म्हणाले की, “कोण आहेत किरीट सोमय्या? देशात असे चु** फार आहेत. देशातील अशा प्रत्येक चु** वर, शिवसेना, देशातील राजकारणाबाबत वारंवार प्रश्न विचारणं मीडियाला शोभत नाही. देशातील राजकारण २०२४ नंतर अशा चु** लोकांना संपवून टाकेल. असे लोक देशात राहणार नाहीत. देशातील राजकारण पारदर्शक असेल. १० मार्चनंतर तुम्हाला कळेल”.
दरम्यान, राऊत यांच्या या टीकेवर सोमय्या यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळांची 100 कोटींची संपत्ती पाहण्यासाठी सोमय्या गेले असता त्यांच्यावर सांताक्रूझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंबंधी भूमिका मांडण्यासाठी आज त्यांना बोलावण्यात आले होते.
त्यानंतर माध्यमांशी बोलताना सोमय्या यांनी राऊत यांच्यावर पलटवार केला. ‘छगन भुजबळांची 100 कोटींची संपत्ती पाहण्यासाठी गेलो होतो, म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजकीय सुडापोटी हा गुन्हा दाखल झाला असल्याचे सोमय्या म्हणाले.
तसेच पुढे बोलताना ते म्हणाले, ‘शरद पवार आणि उद्धव ठाकरे महाराष्ट्राला लुटणार आणि किरीट सोमय्या गप्प राहणार का? असेही सोमय्या यावेळी म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी एकदा काय हजारवेळा मला जेलमध्ये टाकले तरी महाराष्ट्र घोटाळामुक्त करुन दाखवणार असेही सोमय्य यावेळी म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
भीषण अपघात! लग्नासाठी निघालेल्या बसवर काळाने घातला घाला; नवरदेवासह 9 जणांचा भयावह अंत
सामना हारला पण क्रिकेटप्रेमींची मनं जिंकली, नेपाळच्या विकेट कीपरचं जगभरात होतंय कौतूक; पहा व्हिडिओ
बाबो! महिलेच्या पोटातून निघाली फुटबॉलएवढी गाठ, ३ किलोची गाठ पाहून डॉक्टरही झाले हैराण
एकनाथ खडसेंची देवेंद्र फडणवीसांवर जहरी टीका; ‘मी टरबुज्या म्हणणार नाही, पण…’,






