गेल्या काही दिवसांपासून राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांचा सपाटा सुरु असल्याचं दिसत आहे. यामध्ये प्रामुख्यानं महाविकास आघाडी सरकारमधील अनेक बडे नेते रडावर आहेत. अशातच मंगळवारी राजकीय वर्तुळात पुन्हा खळबळ उडाली. ठाकरे कुटुंबालाच थेट ईडीने घेरले.
मनी लॉन्डिरग प्रकरणात मोठी कारवाई करत अंमलबजावणी संचालनालयाने थेट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. त्यांतर केंद्रातील सरकार पदाचा दुरुपयोग करून त्रास देत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.
त्यामुळे शिवसेना आणि केंद्रातील भाजपा सरकार यांच्यातील संघर्ष येणाऱ्या काळात अधिक वाढणार असल्याचे चित्र आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा ठाकरे कुटुंबावर निशाणा साधला आहे.
पत्रकार परिषद घेत सोमय्या याबाबत सविस्तर भाष्य केले आहे. ते म्हणाले, ‘आदित्यने 2014 मध्ये आई रश्मी ठाकरे सोबत कोमो स्टॉक अॅण्ड प्रॉपर्टीज ही कंपनी स्थापन केली. त्यानंतर पाच वर्षानंतर आदित्य यांनी कंपनीच्या संचालकपदाचा राजीनामा दिला. सध्या ही कंपनी देशातील मोठा हवाला किंग नंदकिशोर चतुर्वेदीच्या मालकीची झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, ‘उद्धव यांनी याबाबत काहीही भाष्य केले नाही. नंदकिशोर चतुर्वेदी आणि ठाकरे कुटुंबाचा संबंध काय हे मुख्यमंत्र्यांनी सांगावे, मनी लाँड्रिंग केली आहे का, या प्रश्नांची उत्तरे मुख्यमंत्री ठाकरे यांनी द्यावी अशी मागणी सोमय्या यांनी या पत्रकार परिषदेदरम्यान केली.
सोमय्या एवढ्या वरच थांबले नाही तर त्यांनी पुढे बोलताना ठाकरे यांना सूचक इशारा देखील दिला आहे. ‘आगामी काही दिवसांत आणखी सहा छोटे मोठे घोटाळे बाहेर येणार असून तपास यंत्रणांची कारवाई होणार असल्याचे वक्तव्य त्यांनी केले. तसेच सगळी प्रकरणे समोर आल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांची रात्रीची झोप उडणार असल्याचेही ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
त्याला माझ्या मदतीची काही गरज नाही, तो एक आत्मनिर्भर आहे; रस्त्यावर धावणाऱ्या प्रदीपवर महिंद्रांनी दिली प्रतिक्रिया
करीना कपूरच्या चेहऱ्याची झाली अशी अवस्था, फोटो पाहून चाहत्यांना देखील बसला धक्का
जगातील सगळ्यात घातक विष साईनाईडची टेस्ट कोणालाच नाही माहिती पण आम्ही तुम्हाला सांगतो, वाचा सविस्तर..
इम्रान खान यांनी भारतीय सेनेचे कौतुक केल्याने पाकिस्तानात खळबळ, म्हणाले, ‘ते भ्रष्ट नाहीत आणि..’