राणा दाम्पत्याला अटक केल्यानंतर त्यांना भेटण्यासाठी गेलेल्या किरीट सोमय्यांवर शिवसैनिकांनी काल रात्री हल्ला केला ज्यामध्ये किरीट सोमय्या किरकोळ जखमी झाले. त्यानंतर रात्रभर मुंबईमध्ये हायव्होल्टेज ड्रामा झाला. खार पोलिस स्टेशनबाहेर भाजपचे कार्यकर्ते एकवटले होते. जोपर्यंत हल्ला करणाऱ्यांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत ते तेथून हालचाल करायला तयार नव्हते.
या सगळ्या प्रकारानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मध्यरात्री हा सगळा प्रकार घडल्यानंतर किरीट सोमय्यांनी माध्यमांशी संपर्क साधला आणि ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी अनेक गंभीर आरोप करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे. त्यांनी दावा केला आहे की, दगडफेकीनंतर मला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला.
मला वाटतं मुंबई पोलिस आणि उद्धव ठाकरेंच्या संगमताने हा हल्ला झाला आहे. मला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. हा तिसरा प्रयत्न आहे. पहिला वाशिम, दुसरा पुणे आणि नंतर खार. आश्चर्याची गोष्ट म्हणजे माझी एफआयआर पोलिस घेत नाहीत. पण माझ्या नावाने एक बोगस एफआयआर पोलिसांनी स्वताच रजिस्टर केली. त्यात लिहीलं की कुठूनतरी एकच दगड आला होता.
ठाकरे सरकारला जर असं वाटत असेल की धमक्या देऊन, जीवघेणा हल्ला करून ते त्यांच्या घोटाळेबाजांना वाचवू शकतील तर ते मुर्खांच्या स्वर्गात आहेत. ठाकरे सरकारच्या घोटाळेबाजांच्या घोटाळ्यांच्या अंतापर्यंत किरीट सोमय्या संघर्ष करत राहणार, असं किरीट सोमय्या म्हणाले आहेत. दरम्यान, किरीट सोमय्यांनी पोलिसांवरही गंभीर आरोप लावले आहेत.
किरीट सोमय्या म्हणाले की, पोलिसांनीच मला जमावामध्ये सोडून दिलं. हे मुंबई पोलिसांचं काम आहे. पोलिसांनी मला त्यांच्यामध्ये झोकून दिलं. नंतर संजय पांडेनं वांद्रे पोलिसांवर दबाव आणून किरीट सोमय्याच्या नावाने बोगस एफआयआर नोंदवला. त्यात एकच दगड आला होता असं म्हणत आहेत.
संजय पांडेंना देखील धडा शिकवावा लागणार, असा इशारा किरीट सोमय्यांनी यावेळी दिला. या सगळ्या प्रकारावरून भाजप नेते संतापले आहेत. देवेंद्र फडणवीसांनी थेट गृहमंत्र्यांना पत्र लिहणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे राजकीय वातावरण आणखी तापणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.
महत्वाच्या बातम्या
शरद पवारांनी थेट अमित शहांना सुनावलं, म्हणाले, तुमच्या हातात सत्ता असून तुम्हाला..
देशाची सत्ता असणाऱ्या अमित शहांना दिल्ली सांभाळता येत नाही हे ‘या’ वरून सिद्ध होते; शरद पवारांची जहरी टिका
“एकटे जाणाऱ्या व्यक्तीच्या गाडीवर हल्ला करताय तुम्ही सुद्धा गाडीने एकटे जाणार आहात हे लक्षात ठेवा”