“किरीट सोमय्यांचे हात पाय तोडा; दोन-चार महिने उठले नाही पाहिजेत”

शनिवारी पुण्यात भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर शिवसैनिकांनी हल्ला चढवला. शिवसैनिकांनी केलेल्या धक्काबुक्कीत भाजपा नेते किरीट सोमय्या पायरीवर पडले. जेव्हा ते पडले तेव्हा त्यांच्या माकडहाडाला दुखापत झाल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत.

या घटनेवरून शिवसेना – भाजपमध्ये आणखी एक वादाची ठिणगी पडली आहे. माझ्यावर शिवसैनिकांनी हल्ला केला. हा हल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांच्या आदेशनानुसारच झाला आहे, असा गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. याबाबत ते माध्यमांशी बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले, ‘किरीट सोमय्यांचे हात पाय मोडा. दोन-तीन महिने जागेवर उठता कामा नये अशा प्रकारच्या सूचना शिवसैनिकांना सीएमओतून मिळाल्या होत्या. त्यामुळेच पालिका कार्यालयाला सुट्टी असतानाही जवळपास १०० शिवसैनिक पुणे महापालिकेत शिरले, असे त्यांनी म्हंटले आहे.

तसेच त्यांच्याकडे मोठमोठे दगडे आणि काठ्या होत्या. स्थानिक पोलिसांनी त्यांना रोखायला हवं होतं. मात्र तसं झालं नाही. कारण हा हल्ला पूर्वनियोजित होता. मुख्यमंत्री घाबरले असल्यानंच त्यांनी हत्येसाठी गुंड पाठवले, असा गंभीर आरोप सोमय्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केला.

पालिकेत “१०० लोक आत कसे गेले? आत गेल्यानतंर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी आम्हाला गेटवर सांगितलं का नाही. बिल्डिंगच्या आत सगळे लपले होते. उद्धव ठाकरे इतके घाबरले की आता मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात खून, हत्या घडवत आहेत. महाराष्ट्राच्या जनतेला लाज वाटत आहे,” असं सोमय्या म्हणाले.

दरम्यान, ‘येत्या गुरुवारी मी दिल्लीत जाणार आहे. राष्ट्रीय डिझास्टरचे प्रमुख आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे या हल्ल्याची तक्रार करणार आहे. तसेच उद्या रत्नागिरीला जाणार आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांचा बंगला पाडला की नाही याचा फॉलोअप घेण्यासाठी मी रत्नागिरीला जाणार आहे, असं सोमय्या यांनी सांगितले आहे.

महत्त्वाच्या बातम्या
‘मी तुझा द्वेष करतो, तू अतिशय वाईट केलंस’, लतादीदींच्या निधनानंतर आनंद महिंद्रा झाले भावूक
कौतुकास्पद! पुणे विद्यापीठाच्या प्राध्यापिकेची जेएनयूच्या कुलगुरूपदी निवड, ठरली पहिली महिला कुलगुरू
ह्युंदाईच्या ‘त्या’ ट्विटमुळे भारतीय लोक संतापले, होतेय भारतातून हकालपट्टी करण्याची मागणी
१००० पाकिस्तानही लता दीदींच्या जाण्याचं नुकसान भरून काढू शकत नाही, पाकिस्तानातून लता मंगेशकरांना श्रद्धांजली