राज्यातील हनुमान चालिसाचा वाद वाढत चालला आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांनी मातोश्रीवर येऊन हनुमान चालिसा पठणाची घोषणा केली होती. पण दोन दिवसांच्या नाट्यमय घडामोडीनंतर त्यांनी आपला निर्णय मागे घेतला आहे. (kirit somaiya allegation on uddhav thackeray)
अशात नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांनी दोघांना त्यांच्या घरातून अटक केली. त्यावेळी भाजप नेते किरीट सोमय्या हे त्यांना भेटायला गेले होते. पण शिवसैनिक आक्रमक असल्यामुळे त्यांनी सोमय्यांवरही हल्ला केला होता. तसेच त्यांना जखमी केले होते. त्यानंतर ते पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यास गेले होते. पण त्यांची एफआयआर दाखल करण्यात आली नव्हती.
आता किरीट सोमय्यांनी एक गंभीर आरोप केला आहे. खार पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या एफआयआरवर माझी सही नव्हती. हे खार पोलिसांकडून मी मान्य करुन घेतले आहे, अशी माहिती किरीट सोमय्यांनी दिली आहे. मुंबई पोलिस आयुक्तांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सांगण्यानुसार माझी एफआयआर दाखल करुन घेण्यास नकार दिला आहे, असे किरीट सोमय्यांनी म्हटले आहे.
तसेच खार पोलिसांनी आधीच कारवाई सुरु केली होती. या संदर्भात आपण उद्या राज्यपालांची भेट घेणार आहोत, अशी माहिती किरीट सोमय्यांनी दिली आहे. एफआरआयवर माझी सही नाही, त्यामुळे ती एफआयआर खोटी असल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे.
पोलिस आयुक्तांनी वेबसाईटवर टाकलेल्या एफआयआरवर सोमय्यांची सही नसल्याचं खार पोलिसांनी म्हटले आहे. तसेच आता याप्रकरणी पोलिस आयुक्तांचीच चौकशी झाली पाहिजे. मुंबई पोलिसांच्या गाईडलाईन्सनुसार माझ्यावर गुंडांचा हल्ला झाला आहे, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.
मुंबई पोलिसांच्या आदेशानुसार वांद्रे पोलिसांनी खोटी तक्रार दाखल केली. ती खार पोलिसांना देण्यात आली. खार पोलिसांकडे मी अधिकृत कॉपी मागितली. त्यावर माझी सही नसल्याचे खार पोलिसांनी मान्य केलं आहे. आयपीसी कलम १५४ अंतर्गत माझी सही घेणं आवश्यत होतं, असेही किरीट सोमय्यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
‘त्या’ कारमध्ये मोदी असते तरीही ती फोडलीच असती; अभिनेत्री दीपाली सय्यदकडून हल्ल्याचं समर्थन
भारतीय क्रिकेटपटूंमध्येच जुंपली; इरफान म्हणाला मी देशासाठी खेळलोय, मला बोलायची तुझी लायकी नाही
‘मी हिच्यासाठी मरत आहे’; प्रेयसीचा फोटो ठेऊन स्टेटस टाकले अन् मृत्यूला कवटाळले