आज भाजपा नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांच्यासह त्यांच्या मित्रपरिवारावर पुन्हा एकदा एक गंभीर आरोप केला आहे. राऊत यांचे निकटवर्तीय आणि भागीदार सुजीत पाटकर यांनी बनावट कंपनी निर्माण करून, मुंबईतील कोविड सेंटर्सचं कंत्राट मिळवल्याचा असा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.
याबाबत ते माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, पैशासाठी तुम्ही मुंबई आणि पुणेकरांचा जीव धोक्यात घातला. 58 कोटींचे कंत्राट पाटकर यांना मुंबई महापालिका आयुक्त चहल यांनी दिले. हा पाटकर राऊत यांचा भागिदार आहे. पाटकर याने एक नाही तर अशी सात कंत्राटे मिळवली आहेत. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.
पुढे बोलताना सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. ‘मी आयुष्यात कधी विडी, सिगारेट बिअरही प्यायलो नाही. अंडही खाल्लं नाही. ठाकरे सरकारच्या ठोकशाहीला ठोकण्याची माझ्यात नशा असल्याचे किरीट सोमय्या यांनी म्हटले. तसेच कोव्हिड रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचे काम आदित्य आणि उद्धव ठाकरे यांनी केले असल्याचे त्यांनी म्हटले.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच सोमय्या पुणे दौऱ्यावर असताना ते पुणे महानगरपालिकेला भेट देणार होते. यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना महापालिकेत जाण्यापासून रोखले. यावेळी धक्काबुक्की देखील झाली. या धक्काबुकीत किरीट सोमय्या पायऱ्यांवर पडले.
त्याच झालं असं, सोमय्या महापालिकेच्या आयुक्तांना भेटायला आले होते. त्यावेळी पालिकेत भ्रष्टाचार होत असून त्याचे निवेदन देण्यासाठी शिवसैनिक पालिकेत आले होते. यावेळी पालिकेच्या जुन्या इमारतीत सोमय्या आल्यावर शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली तसेच निवेदन देण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान पुणे महापालिकेत आलेल्या किरीट सोमय्याची शिवसैनिकां सोबत धक्काबुक्की झाल्यानंतर राजकिय वर्तुळातील वातावरण चांगलेच तापले आहे. मुख्य म्हणजे याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सात ते आठ शिवसैनिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दुसऱ्या बाजूला सोमय्यांसोबत भाजप नेते देखील ठाकरे सरकारवर निशाणा साधताना दिसत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
|मुलीच्या लग्नानंतर ‘असा’ रचला ईडीने सापळा; संजय राऊतांचा ईडीवर खळबळजनक आरोप
माझा लालूप्रसाद यादव करण्याची धमकी दिली, संजय राऊतांच्या लेटरबॉम्बने राजकीय वर्तुळात उडाली खळबळ
“…तर तुम्हाला नागपुरलाही जाता येणार नाही” संजय राऊत यांचा थेट फडणवीसांना इशारा
भारतात समान नागरी कायदा लागू होणार? वाचा काय आहे भाजपचा मास्टर प्लॅन