प्रसिद्ध अभिनेते किरण माने हे अनेकदा त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत येत असतात. ते सोशल मीडियावर खुप ऍक्टिव्ह असतात आणि वेगवेगळ्या मुद्यांवर भाष्य करत असतात. काही वेळा त्यांच्या वक्तव्यांमुळे ते वादातही अडकतात. आता पुन्हा एकदा ते त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहे. (kiran mane talk about mahamanav)
आता महामानवांच्या जयंतीवर किरण माने यांनी आपले मत मांडले आहे. त्यांची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. महामानवांच्या जयंत्या साजऱ्या कराव्या पण त्यात कृतज्ञता असावी. मिरवणूका काढू नये, त्यापेक्षा त्यांच्या विचारांचे पुन:पुन्हा स्मरण करावे, असे किरण माने यांनी म्हटले आहे.
किरण मानेंची फेसबूक पोस्ट-
…जयंती जरूर साजरी करावी. आपल्या महामानवांविषयीची कृतज्ञता असते ती. पण मला लै मनापास्नं असं वाटतं की, ही जयंती डिजे लावून, मिरवणूका काढून नाही, तर त्यांच्या विचारांचे पुन:पुन्हा स्मरण करून, ते विचार आजच्या गढूळ झालेल्या भवतालात कसे मार्गदर्शक ठरतील यावर चर्चा करून साजरी व्हावी. असं काम करणारे लोक जेव्हा मला आवर्जुन संवाद साधायला बोलावतात तेव्हा लै लै लै समाधान वाटतं दोस्तांनो !
तसेच किरण माने यांनी त्यांच्या कार्यक्रमांबद्दलही माहिती दिली आहे. बुद्धजयंती आणि छ. संभाजी महाराज जयंती उत्सवात आपणा सर्वांबरोबर बोलायला येतोय… १३ मे – कोरेगांव जि. सातारा – स्वराज्यवीर, स्वातंत्र्यवीर छ. संभाजी महाराज जयंती उत्सव. १४ मे – मुंबई (चेंबूर) – भिम आर्मी, भारत एकता मिशन तर्फे जयंती साजरी न करता जयंती सोहळ्यासाठी जमा झालेले पैसे वाचवून माझ्या हस्ते गरीब हुशार विद्यार्थ्यांना तसेच आदिवासी विद्यार्थ्यांना रोख आर्थिक मदत.
https://www.facebook.com/kiran.mane.9047/posts/10225210759243631
१६ मे, सकाळी ११ – मिल्ट्री अपशिंगे – बुद्धजयंती, व्याख्यान विषय : तथागत बुद्ध आणि संत तुकाराम, १६ मे, सं ७ – नवहिंद प्रतिष्ठान, सांगली, व्याख्यान विषय : जागतिक दर्जाचे साहित्यिक, कवी आणि महापराक्रमी महापुत्र छ. संभाजी महाराज. आवर्जुन या…
दरम्यान, महामानवांच्या जयंत्या झाल्या असल्या तरी १३ मे ते १६ पर्यंत किरण मानेंना छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि बुद्ध जयंती यांच्या कार्यक्रमांना बोलवण्यात आले आहे. तसेच या सोहळ्यातून जमा होणारे पैसे मानेंच्या हस्ते गरीब हुशार विद्यार्थ्यांना तसेच आदिवासी विद्यार्थ्यांना रोख आर्थिक मदत देणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
मुस्लिमांनी बाजू नाही मांडली तर थेट निकाल सुनावणार, ‘या’ कारणामुळे संतापले न्यायालय
अश्विनने अर्धशतक ठोकताच पत्नीच्या आनंदाचा नाही राहिला ठावठिकाणा, व्हिडीओ होतोय प्रचंड व्हायरल
२ पेक्षा जास्त वेळा बोहल्यावर चढले आहेत ‘हे’ बॉलिवूड अभिनेते, काहींनी तर ४ वेळा केलंय लग्न