राज्यात सध्या सत्ताधारी पक्ष विरुद्ध भाजप आणि मनसे असा वाद पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना नास्तिक म्हटले होते. तसेच शरद पवार तुम्हाला कधीही मंदिरात दिसून येणार नाही, असेही राज ठाकरेंनी म्हटले होते. (kiran mane share post to support sharad pawar)
राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांचे मंदिरातील अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यानंतर या वादात भाजपने उडी घेत शरद पवारांच्या भाषणाचा एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यात शरद पवार जवाहर राठोड यांची एक कविता बोलताना आम्ही देवांचे बाप आहोत असे म्हणत होते. पण त्याचा उल्लेख कवितेत केलेला होता.
शरद पवारांच्या या भाषणावरुन त्यांच्यावर भाजपने जोरदार टीका केली होती. तसेच ते नास्तिक आहे, असे भाजपने म्हटले होते. तसेच देवांचा अपमान करुन ते इतके मोठे झाले आहेत, असे भाजपने म्हटले होते. यामुळे राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. असे असताना आता या वादात प्रसिद्ध अभिनेते किरण माने यांनी उडी घेतली आहे.
जगद्गुरू संत तुकोबारायांनीच त्यांच्या अभंगांमध्ये याबाबत माहिती दिली आहे, असे म्हणत किरण मानेंनी अप्रत्यक्षपणे भाजपला टोला लगावला आहे. तुकारामांनी त्यांच्या अभंगांमध्ये बोलताना म्हटले आहे की, ब्रम्हदेवाचे आम्ही जन्मदाते आहोत. आम्हाला कुणी निर्माण केलेले नाही. यासंबंधी किरण माने यांनी एक फेसबूक पोस्ट शेअर केली आहे.
फेसबूक पोस्ट-
“…आम्ही ब्रह्मदेवाचे ‘बाप’ आहोत बेट्याहो. आम्ही त्याला जन्म दिलाय. आम्हाला त्यानं निर्माण केलेलं नाही.” थांबा..थांबा भावांनो. हे व्हायरल करून निषेध करायच्या आधी हे कुनी लिहीलंय ते तरी तपासा… वर्चस्ववादाविरोधात दंड थोपटून उभा र्हायलेल्या आपल्या डॅशिंग हिरो जगद्गुरू संत तुकोबारायांनी हे छातीठोकपने सांगीतलंय !!
“तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते । स्वयंभू आइते केले नव्हो ।।” ‘विधी’ म्हंजे ब्रह्मदेवाचे आमी जन्मदाते आहोत. स्वयंभू आहोत, आयते आहोत..कुनी निर्माण फिर्माण केलेले नाही आहोत. हे सांगताना तुकोबाराया म्हन्तो, तुमच्या समद्या शास्त्रांचं सार आन वेदांची मूर्ती एकच हाय – ‘विठोबा’. विठोबा आमचा जीवाचा सखा हाय.. आमी कुठल्या कर्मकांडाची फिकीर करत नाय कारन फक्त एक विठोबाचे नांवच आमच्या समद्या काळज्या दूर करतं..
“शास्त्रांचे जे सार वेदांची जो मूर्ती । तो आम्हा सांगाती प्राणसखा ।।
म्हणउनी नाही आणिकांचा पांग । सर्व झालें सांग नामें एका ।।
सगुण निर्गुण जयाचिये अंगे । तोचि आम्हां संगे क्रिडा करी ।।
तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते । स्वयंभू आइते केले नव्हो ।।”
https://www.facebook.com/1460418198/posts/pfbid02uQG8yKNbktaASbSWnPBqbu6iL2Su9UJ719MMMT4ycFs2D2wuH1WVp3Nejk8fhwXTl/?d=n
…सहा शास्त्रांचे सार, वेदांची मूर्ती असलेला विठोबा कायम आमच्या संगतीत असलेला आमचा प्राणसखा आहे …त्यामुळे आम्हाला कोणाचीही पर्वा नाही, फिकीर नाही. त्याच्या नामाने आमच्या सगळ्या चिंता दूर झाल्या आहेत. सगुण-निर्गुण दोन्ही अंगे असलेला विठ्ठल प्रत्यक्ष आमच्यासोबत खेळ खेळतो. शेवटी तुका म्हणे : “आम्ही ब्रह्मदेवाचे जन्मदाते आहोत. आम्ही स्वयंभू असल्यामुळे आम्हाला कोणी निर्माण केले नाही !” इषय कट. खेळ खलास. ठ्ठलइठ्ठलइठ्ठलइठ्ठलइठ्ठलइठ्ठलइठ्ठलइठ्ठलइठ्ठलइठ्ठल
महत्वाच्या बातम्या-
तेव्हा संपूर्ण ठाणे जळत होतं अन्…; आनंद दिघेंच्या आठवणीत अभिनेत्रीची भावूक पोस्ट
VIDEO: ‘महाराणी’च्या राणीने पुलमध्ये दाखवला बोल्ड अंदाज, कुरेशी गर्लचे भिजलेले अंग पाहून नेटकरी घायाळ
जेव्हा सिद्धार्थ म्हणाला, ‘आलियाला किस करणे बोरिंग आहे, मला ‘या’ अभिनेत्रीला किस करायचंय’