एखाद्या कलाकाराने सोशल मीडियावर कुठल्याही राजकीय नेत्याविरुद्ध परखड मत व्यक्त केल्यास त्या कलाकाराला त्याचे परिणाम भोगावे लागतात. अशा अनेक घटना आपल्याला ऐकायला मिळतात. असाच काहीसा प्रकार मराठी अभिनेता किरण माने यांच्यासोबत घडला आहे. राजकीय भूमिका मांडल्यामुळे ‘मुलगी झाली हो’ या लोकप्रिय मालिकेतून अभिनेता किरण माने यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
आज अभिनेता किरण माने यांनी फेसबुकवर यासंदर्भात एक पोस्ट टाकली आहे. ‘काल टो जुबान, आंसुओं से गाऊंगा… गाड दो, बीज हूँ मैं. पेड बन ही जाऊंगा!’, असे अभिनेता किरण माने यांनी पोस्ट मध्ये लिहले आहे. अभिनेता किरण माने यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्यांच्या चाहत्यांनी आय स्टॅन्ड विथ किरण माने असा हॅशटॅग वापरून त्यांना पाठिंबा दर्शविला आहे.
एका मुलाखतीमध्ये अभिनेता किरण माने यांनी सांगितले की, “महाराष्ट्रातील नागरिकांच्या दुर्दैवानं ही बातमी खरी आहे. मला माझ्या राजकीय भूमिकेमुळे ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून काढण्यात आलं आहे. तुम्ही सत्ताधाऱ्यांविरोधात आवाज उठवायचा नाही किंवा तुम्ही कुठल्या विचारधारेविरोधात आवाज उठवायचा नाही. नाहीतर आम्ही तुमच्या पोटावर पाय आणू, तुमचं जगणं मुश्किल करु असा एक संदेश देण्याचा प्रयत्न यातून झाला आहे.”
“मला कुठल्याही राजकीय नेत्याचा फोन आला नाही. पण राजकीय पक्षाशी संबंधित अनेक पक्षाच्या कार्यकर्त्यांचे मला फोन आले. मला बाकी काही म्हणायचं नाही पण ही झुंडशाही किती दिवस सहन करायची? आपण महाराष्ट्रात राहतो, यूपी किंवा बिहारमध्ये राहत नाही. तुम्ही तुमचं मत मांडायचं नाही, नाहीतर बघा आम्ही काय करु तुम्हाला, हे किती दिवस आपण सहन करायचं? हे प्रत्येक नागरिकानं आता स्वत: ठरवायचं आहे”, असे देखील किरण माने यांनी सांगितले.
“बघू आता एका कलाकारासाठी किती लोक, कोणता राजकीय पक्ष माझ्या मागे उभा राहतो. आणि जर कुणीही नाही माझ्यामागे उभा राहिला तरी मी तुकाराम महाराजांचा भक्त आहे, शिवाजी महाराजांचा भक्त आहे, वारकरी संप्रदायाचा आहे. मी एकटा लढेन. माझं अभिव्यक्ती स्वातंत्र्य कुणी हिरावून घेऊ शकणार नाही”, अशी संतप्त प्रतिक्रिया अभिनेता किरण माने यांनी या घटनेवर दिली आहे.
अभिनेता किरण माने यांच्याविरुद्ध घडलेल्या या घटनेचा काही राजकीय पक्षांच्या नेत्यांनी निषेध केला आहे. काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. ‘हा भाजपचा सांस्कृतिक दहशतवाद आहे. भाजप विरोधात बोलण्याची हिमंत कशी होते हा दभं त्यामागे आहे.’ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील ट्विट करत या घटनेचा निषेध केला आहे.
महत्वाच्या बातम्या :-
‘या’ व्यक्तीमुळे झाला लतादीदींना कोरोना, घरातीलच व्यक्ती निघाली कोरोना पॉझिटिव्ह
महिलेच्या गाडीला फळवाल्याचा चुकून धक्का लागला; त्यानंतर महिलेने रागाच्या भरात जे केले ते पाहून संताप येईल
होम लोनऐवजी भाड्याच्या घरात राहा आणि EMI च्या पैशांनी घ्या २-३ घरे, जाणून घ्या कसे