Share

‘सुंदर दिसण्यासाठी मी गु खायलाही तयार’; प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वक्तव्याने उडाली खळबळ

सेलिब्रिटी नेहमीच चर्चेत राहण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करताना दिसून येतात. अनेकदा ते चाहत्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी हटके फोटोशूट करतात किंवा एखादे हैराण करणारे वक्तव्य करतात. त्यातलीच एक म्हणजे किम कार्दशियन. ती अनेकदा तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत येत असते. (kim kardashian shocking statement on beauty)

प्रसिद्ध अमेरिकन रिऍलिटी शो स्टार किम कार्दशियन अनेकदा अशा धक्कादायक कमेंट्स करत असते, ज्यामुळे ती चर्चेत येते. आताही तिने नुकत्याच एका मुलाखतीत अशीच एक प्रतिक्रिया दिली आहे. ज्यामुळे लोकांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

अलीकडेच किम कार्दशियनने न्यूयॉर्क टाइम्सला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला विचारण्यात आले की ती तरुण दिसण्यासाठी काय करू शकते? उत्तरात ती म्हणाली, ‘मी काहीही करेन. जर तुम्ही मला सांगितले की मला तरुण दिसण्यासाठी रोज विष्ठा खावी लागेल, तर मी ते देखील करू शकते. किमच्या या वक्तव्याने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.

किमच्या या वक्तव्यावर एका सोशल मीडिया यूजरने म्हटले की, ‘मला असे का वाटते की किमने हे केले आहे.’ दुसर्‍या यूजरने लिहिले की, अरे ती डोक्यावर पडलीये. किमच्या एका चाहत्यानेही तिच्यावर कमेंट केली आहे. तो म्हणाला, की मी तुझ्यावर किती प्रेम करतो पण तु असे का बोलतेस?

याआधी ती तेव्हा चर्चेत आली होती, जेव्हा तिचा प्रसिद्ध रॅपर कान्ये वेस्टपासून घटस्फोट झाला होता. घटस्फोटानंतर किमने कॉमेडियन पीट डेव्हिडसनला डेट करायला सुरुवात केली. तेव्हापासून, किम आणि पीट अनेक प्रसंगी एकत्र दिसले. अलीकडेच किमने तिची नवीन ब्युटी लाइन आणि परफ्यूम ब्रँडही लॉन्च केला आहे.

किम कार्दशियन सोशल मीडियावर खुप प्रसिद्ध आहे. इंस्टाग्रामवर तिचे ३१५ मिलियनपेक्षा जास्त फॉलोवर्स आहे. त्यावर अनेकदा ती बोल्ड फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. तिच्या फोटोंवर चाहते नेहमीच तिचे कौतूक करत असताना दिसत असतात, पण तिने केलेल्या वक्तव्यानंतर तिच्या चाहत्यांनी सुद्धा तिला ट्रोल केले आहे.

महत्वाच्या बातम्या-
९ रुपयांच्या ‘या’ मल्टीबॅगर शेअरने दिला तब्बल ३६४० टक्के परतावा, गुंतवणूकदार मालामाल
सौरव गांगुलीने राजीनाम्याचा प्रँक केल्यानंतर चाहत्यांनी केले ट्रोल, भन्नाट मीम्सचा पडला पाऊस
IPL पाठोपाठ टीम इंडियानेही डावलले, ‘या’ दिग्गज स्टार गोलंदाजाची कारकीर्द जवळपास संपुष्टात

ताज्या बातम्या आंतरराष्ट्रीय

Join WhatsApp

Join Now