भारतात लाँचिंग होताच ‘या’ कारचा धुमाकूळ, पहिल्याच दिवशी रेकॉर्डतोड बुकिंग्स

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजेच शुक्रवारपासून नवीन Kia Carens चे बुकिंग सुरू झाले आहे. Kia India ने यासंदर्भातील घोषणा केली आहे. आनंदाची बाब म्हणजे भारतात लाँचिंग होताच कारला तुफान प्रतिसाद मिळाला आहे. या कारला पहिल्याच दिवशी ७७३८ हून जास्त बुकिंग्स मिळाल्याची माहिती कंपनीकडून दिली गेली आहे.

तसेच कार इच्छुक ग्राहक Kia India च्या अधिकृत वेबसाइट आणि देशभरातील डीलरशिपद्वारे 25,000 रुपयांमध्ये प्रीमियम MPV बुक करू शकतात. याशिवाय, https://www.kia.com/in/buy/pre-booking.html या लिंकद्वारे ग्राहक त्यांच्या पसंतीच्या व्हेरिएंटच्या कार घरबसल्या बुक करू शकतात.

तसेच Kia Carens MPV हे Kia Seltos, Sonnet आणि Carnival नंतर भारतीय बाजारपेठेतील कंपनीचे चौथे उत्पादन आहे. MPV मारुती सुझुकी XL6, महिंद्रा मराझो, टोयोटा इनोव्हा क्रिस्टा आणि Hyundai Alcazar सारख्या प्रतिस्पर्ध्यांशी स्पर्धा करेल. MPV ची निर्मिती भारतात स्थानिक पातळीवर केली जाईल, जी डाव्या हाताच्या आणि उजव्या हाताच्या ड्राइव्ह मार्केटसह जगातील ९० परदेशी बाजारपेठांमध्ये निर्यात केली जाईल.

दरम्यान, Kia Carens MPV 8 रंग पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. यामध्ये इम्पीरियल ब्लू, मॉस ब्राउन, स्पार्कलिंग सिल्व्हर, इंटेन्स रेड, अरोरा ब्लॅक पर्ल, ग्रॅव्हिटी ग्रे, ग्लेशियर व्हाइट पर्ल आणि क्लियर व्हाइट. Kia India चा दावा आहे की, कॅरेन्स ही प्रीमियम SUV ची शैली आणि MPV च्या व्यावहारिकतेचे परिपूर्ण मिश्रण आहे.याममध्ये अनेक फर्स्ट-इन-क्लास फीचर्स उपलब्ध असल्याचा कंपनीचा दावा आहे.

कंपनीने १६ डिसेंबर रोजी Kia ची ही आगामी कार पहिल्यांदा सादर केली होती. ही कार मजबूत लुकसह उत्कृष्ट वैशिष्ट्यांसह सज्ज आहे. Apple CarPlay, Android Auto आणि Kia’s UVO Connect सह १०.२५-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, एक संपूर्ण डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, एक आठ-स्पीकर बोस साउंड सिस्टम, ६४-कलर एंबियंट लाइट, कप होल्डरसह हवेशीर समोरच्या सीट, सीट-बॅक टेबल सुसज्ज आहे.

याचबरोबर Kia MPV साठी ट्रान्समिशन पर्यायांमध्ये सहा-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स, सात-स्पीड DCT ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आणि सहा-स्पीड ऑटोमॅटिक युनिट देखील समाविष्ट असेल. कंपनीने अद्याप त्याच्या किमती जाहीर केल्या नसल्या तरी, Kia Carens भारतीय बाजारात १३ ते १७ लाखांपर्यंत येऊ शकते असा अंदाज वर्तवला जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या
जेव्हा पराभव होऊनही जिंकली होती २७ वर्षांची मुलगी, बनली होती पहिली दलित मुख्यमंत्री
अल्लू अर्जुनने श्रेयस तळपदेचे केले तोंडभरून कौतुक; म्हणाला, श्रेयसजी तुमचा आवाज..
छोट्या पक्षांशी युती करून अखिलेश यादव जिंकणार निवडणुक? सर्वेमधून झाला हैराण करणारा खुलासा
‘मी आतापर्यंत १३७ मुलांना लग्नास दिलाय नकार’, प्रसिद्ध अभिनेत्रीने मुलाखतीत केला खुलासा