ह्युंदाईच्या पाकिस्तान ट्विटर हँडलवरून अलीकडेच काश्मीरबाबत अशी पोस्ट टाकण्यात आली होती, जी पाहून भारतीयांचा संताप अनावर झाला होता. नेटकऱ्यांनी कंपनीवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. यानंतर कंपनीने ती पोस्ट हटवली आणि अधिकृत ट्विटर हँडलवरून एक स्टेटमेंटही जारी केले. (kfc troll after tweet)
असाच एक प्रकार केएफसीच्या बाबतीतही घडला आहे. केएफसीच्या पाकिस्तान ट्विटर हँडलवरून काश्मीरबद्दल एक ट्विट देखील करण्यात आले होते, ज्यामुळे भारतीयांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या. यावर अनेक यूजर्स #BoycottKFC हॅशटॅग वापरत नाराजी व्यक्त करत होते.
We deeply apologize for a post that was published on some KFC social media channels outside the country. We honour and respect India, and remain steadfast in our commitment to serving all Indians with pride.
— KFC India (@KFC_India) February 7, 2022
केएफसीला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते. त्यानंतर आता केएफसी इंडियाला ट्विटरच्या माध्यमातून त्या पोस्टवर माफी मागावी लागली आहे. केएफसीने लिहिले, देशाबाहेरील काही सोशल मीडिया अकाऊंटवरुन पोस्ट केलेल्या पोस्टबद्दल आम्ही दिलगीर व्यक्त करतो. आम्ही भारताचा आदर करतो आणि भारतीयांच्या सेवेसाठी पूर्णपणे वचनबद्ध आहोत.
एवढा गदारोळ माजवणाऱ्या केएफसीची पोस्ट प्रत्यक्षात काश्मीर एकता दिनानिमित्त पाकिस्तानात टाकण्यात आली होती. या काश्मीर एकता दिनी आम्ही त्यांच्या स्वातंत्र्याच्या हक्कासाठी एकत्र उभे आहोत, असे या पोस्टमध्ये लिहिलेले होते. ही पोस्ट भारताच चांगलीच व्हायरल झाली, त्यामुळे लोकांनी त्यांनाही ट्रोल करण्यास सुरुवात केली.
भारतात सोशल मीडियावर लोक संताप व्यक्त करत आहेत. लोक काय म्हणत आहेत की त्यांच्या सरकारने कारवाई करायला पाहिजे. आधी ह्युंजाई आणि नंतर कीया आणि आता केएफसी यांच्यावर सरकारकडून काही कारवाई व्हायला हवी, असे एका यूजरने म्हटले आहे. तर एकाने म्हटले की, यांची हिंमत कशी होते, असं काही बोलण्याची.
एका वापरकर्त्याने केएफसीची माफीनामा पोस्टही नाकारली आहे. युजरने म्हटले आहे की, आम्हाला माफीचे पत्र हवे आहे, तुम्ही अशी पोस्ट कशी करू शकता? काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. तुम्ही भारताला सोडून निघून जाण्याची वेळ आली असून तुम्ही भारत सोडून जायला पाहिजे.
तसेच काश्मीर मुद्यावर तुम्ही माफीनामा लिहित आहात. तर मग तुम्ही काश्मीर भारताचे आहे आणि ते भारताचे होते आणि नेहमीच भारताचेच असेल असे ट्विट का करत नाही, असे एका यूजरने म्हटले आहे. केएफसीला काश्मीर मुद्यावर बोलणे चांगलेच महागात पडले आहे. त्यामुळे त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.
याआधी ह्युंदाईबाबत भारतात सोशल मीडियावर खूप आक्षेप घेण्यात आले होते, त्यानंतर कंपनीला पोस्ट हटवण्यासोबतच अधिकृत पत्रही जारी करावे लागले होते. भारत अनेक कंपन्यांसाठी खूप मोठी बाजारपेठ आहे आणि जर एखाद्या ब्रँडला येथून बाहेर पहावे लागले तर त्याचे खूप मोठे नुकसान होऊ शकते.
महत्वाच्या बातम्या-
‘लतादीदींमुळे माझी बिर्याणी फेमस झाली, माझं अख्खं कुटुंब त्यावर जगलं’; वाचा भावूक करणारा किस्सा..
घर मालकीणीने अनैतिक संबंधाला विरोध केल्यामुळे, 30 वर्षीय तरुणाने महिलेची केली निर्घृण हत्या…
शाहरुखच्या समर्थनात उर्मिला मातोंडकर मैदानात, म्हणाली, आपण इतके बिघडलो आहोत की..