Share

Ketki mategaonkar: तू मला सोडून गेलास पण.., भावाच्या आत्महत्येनंतर केतकी माटेगावकरची ह्रदयद्रावक पोस्ट

Ketki mategaonkar post for his brother | चित्रपट सृष्टीमधील लोकांचे जीवन कितीही ग्लॅमरस वाटत असले, तरी त्यांचे वैयक्तिक जीवन मात्र सर्वसामांन्यांसारखेच सुखदु:ख आणि अडचणींनी भरलेले असते. गायिका व अभिनेत्री केतकी माटेगावकर हिच्यावरही काही दिवसांपूर्वी एक दुखद प्रसंग ओढवला होता.

केतकी माटेगावकरच्या चुलत भावाचं दोन आठवड्यापूर्वीच निधन झालं. इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून २१ वर्षाच्या अक्षय माटेगावकरने आत्महत्या केली. तो पुण्यातील सुसगाव इथे राहत होता. इंजिनिअर असलेल्या अक्षयने नोकरी मिळत नसल्याने आत्महत्या करत असल्याचं त्याच्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं होतं.

या प्रसंगामुळे माटेगावकर कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. या धक्क्यातून अजूनही माटेगावकर कुटुंब पूर्णपणे सावरले नाही. दोन आठवड्यानंतर आता केतकी माटेगावकर हिने अक्षयसोबतचे काही फोटो आणि एक भावूक पोस्ट इन्स्टाग्राम अकाउंटद्वारे शेअर केली आहे.

केतकी आणि अक्षयमध्ये खूप घट्ट नातं असल्याचं या पोस्टमधून दिसून येते. केतकीने भावासाठी लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं की, “माझा छोटासा गोड अक्षु, तुझ्यासारखा सुस्वभावी, समंजस, अष्टपैलू, मेहनती भाऊ मला मिळाला. आता तू नाहीस. पण आता काय लिहू, किती लिहू, लिहू की नको लिहू, असं झालंय. २१ वर्षाच्या आठवणी काही शब्दात कशा लिहू याचा विचार करते.

गेल्या काही दिवसांपासून मला फक्त तुझ्यासोबत घालवलेले क्षण आठवतात. मला हे क्षण माझ्यापासून कधीच दूर करायचे नाहीत. ती पुढे लिहिते की, अभ्यास झाला की सगळं बाजूला ठेवून रियाजामध्ये हरवून जाणारा अक्षु, गझल, ठुमरी ऐकत बसणारा अक्षु, कधी शास्त्रीय संगीत तर कधी फुटबॉलचे ज्ञान आत्मसात करणारा अक्षु मला सोडून गेला.

केतकीने पुढं लिहिलं की, तुझा समजुतदारपणा आणि हुशारी खूपच अतुलनीय होती. पण तुझी केतकी ताई म्हणून एक गोष्ट सांगते, आयुष्यात कुठलीही गोष्ट, ध्येय, स्वप्न, विचार हे आपल्या स्वत:पेक्षा मोठे नसतात आणि ते मोठे होऊही द्यायचे नसतात. आपण आहोत म्हणून त्यांना अस्तित्व आहे. तू मला सोडून गेलास पण तू आमच्यासोबत कायम आहेस आणि राहशील.

माझा लहान भाऊ एक अप्रतिम कलाकार होता याचा मला कायम अभिमान वाटत राहील, असेही तिने याठिकाणी लिहिले. ही भावूक पोस्ट शेअर करत केतकीने सोशल मिडीयावर आपले दु:ख व्यक्त केले आहे. यावरून केतकीचे आपल्या भावावर प्रचंड प्रेम असल्याचे दिसून येते.

https://www.instagram.com/p/Cgho175JsIR/?utm_source=ig_web_copy_link

महत्वाच्या बातम्या
शिंदेंचा आता भाजपलाच दणका; भाजपला धडा शिकवणारा ममता, ठाकरे सरकारचा निर्णय रद्द करण्यास नकार
Uddhav Thackeray: उद्धवला ज्या भावामुळे मिळाली आवडती बायको मिळाली, नंतर त्याचेच उद्ध्वस्त केले करिअर!
Yogi Sarkar: त्यांच्या अंगावर पुष्पवृष्टी अन् आमच्या घरांवर बुलडोझर, योगी सरकारवर ओवैसी संतापले
‘मनोहर जोशींचा राजीनामा घेतला तेव्हा बाळासाहेबांनी…,’ मनसे नेत्याने केली पोलखोल, वाचा काय आहे ‘तो’ किस्सा

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now