Share

Ketki chitale : भाजपची लाडकी ‘ही’ अभिनेत्री म्हणते, ‘आमचे हिंदू देव तर दारूही पितात, त्यामुळे..

ketki chitale | अभिनेत्री केतकी चितळे नेहमी सोशल मिडीयावर काही ना काही शेअर करत असते. तिच्या वक्तव्यांमुळे आणि तिच्या व्हिडीओंमुळे ती नेहमी चर्चेत असते. अनेकवेळा तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे ती अडचणीतही सापडली आहे. २०२२ मध्ये तिला तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळं जेलमध्येही जावं लागलं होतं.

तिला काही महिन्यांपुर्वीच तिच्या फेसबूकचं एक्सेस परत देण्यात आलं आहे. एक्सेस परत मिळाल्यानंतर ती पुन्हा फेसबूकवर सक्रीय झाली आहे. त्यानंतर केतकीच्या फेसबूक पोस्ट पुन्हा चर्चेचा विषय ठरत आहेत. ३१ डिसेंबरलाही तिनं एक पोस्ट शेअर केली जी चर्चेचा विषय ठरत आहे.

तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामुळे ती पुन्हा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे. पण नेटकऱ्यांनी ट्रोल केल्यानंतर केतकीने नेटकऱ्यांना सडेतोड उत्तरही दिलं आहे. तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामध्ये तिच्या हातात दारूचा ग्लास आहे.

ग्लास हातात घेऊन केतकी सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना तिनं लिहीलं आहे की, फादर त्या सगळ्यांना माफ करा. कारण त्यांना माहिती नाहीये की ते काय करत आहेत. ती काही चुकीचं बोलत असेल तर मला नक्की सांगा.

मैं कट्टर सनातन हिंदू हूँ लेकीन इसका मतलब यह नहीं की बाकी सब १००% गलत है. सगळ्यांना माफ करा पण कधी विसरू नका, असं केतकी म्हणाली आहे. केतकीचा दारू पितानाचा व्हिडीओ पाहून नेटकरी चांगलेच संतापले. पुन्हा एकदा केतकीला त्यांनी धारेवर धरलं आहे. एक नेटकरी म्हणाला की, वाह दीदी.. लोकांना सांगायचं इंग्रजी परंपरा पाळू नका आणि आपण ढोसायचं.

या युजरला उत्तर देताना केतकीने पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केलं. ती म्हणाली की, मी कधी म्हणाले इंग्रजी परंपरा पाळू नका? सोमरस म्हणजे वाईन. सनातन धर्मात दारू आहे. आमचे देवही दारू पितात. काली मातेला तर दारूचे नैवेद्य असते. तसंच काही शंकराच्या मंदिरातही. स्वताची संस्कृती शिका, हे मी नेहमी लिहीते आणि सांगते. फरक शिका.

https://www.facebook.com/812055050/videos/469651891995590/

महत्वाच्या बातम्या
J P nadda : भाजपच्या सभेचा उडाला फज्जा; रिकाम्या खुर्च्यांचा व्हिडीओ शेअर करत दानवे म्हणाले, नड्डा हा पहा खड्डा..
भारतमातेसाठी शहीद झाला अरविंद अन् लगेचच पत्नीने दिला गोंडस मुलाला जन्म
Gulabrao patil : लोकसभा निवडणूकीत शिंदे गटाला एकही जागा मिळणार नाही? गुलाबराव पाटलांचे सुचक वक्तव्य
बिनविरोध निवडूण आलेल्या तरूणाचा लगेचच मृत्यू; अख्ख्या गावावर कोसळला दुखाचा डोंगर

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now