राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात प्रसिद्ध अभिनेत्री केतकी चितळेने एक आक्षेपार्ह पोस्ट केली होती. त्याप्रकरणी पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आहे. गेल्या १० दिवसांपासून केतकी चितळे जेलमध्ये आहे. असे असतानाही ती आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसून येते. (ketki chitale laughing with police )
आता केतकीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यामध्ये केतकी हसताना दिसून येत आहे. १० दिवसांपासून ती तुरुंगात आहे. तसेच सात जूनपर्यंत तिला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली, अंडीफेक, शाईफेक झाली, तरी तिच्या चेहऱ्यावरचे हसू कायम आहे.
न्यायालयात हजर करण्यापूर्वी तिचे मेडिकल चेकअप करण्यात आले होते, तिथेही ती हसताना दिसून आली आहे. तिथे उपस्थित असलेल्या डॉक्टरांशी आणि पोलिसांशी ती हसताना बोलताना दिसली. अटकेनंतर जेव्हा तिच्यावर अंडी फेकण्यात आली, तेव्हाही ती हसताना दिसत होती.
केतकीने शरद पवार यांच्याबद्दल फेसबूकवर आक्षेपार्ह पोस्ट केली होती. त्यानंतर १४ मेला पोलिसांनी केतकीला अटक केली होती. केतकीविरुद्ध एका राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी तिला अटक केले होते.
केतकी विरोधात फक्त ठाण्यातच नाही, तर गोरेगाव, नाशिक, पुणे, धुळे, उस्मानाबाद अशा ठिकठिकाणी गुन्हे दाखल झाले. केतकीच्या टीकेनंतर राजकीय, सामाजिक आणि मनोरंजनसृष्टीतूनही प्रतिक्रिया उमटल्या होत्या. अनेकांनी तिच्या या पोस्टला विरोध केला होता.
याआधीही केतकी चितळे अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. केतकी अनेकदा तिच्या पोस्टमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. त्यामुळे बऱ्याचदा ती ट्रोलही होत असते. तिने तुझं माझं ब्रेकअप आणि आंबटगोड अशा मालिकांमध्ये काम केलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
ट्रेकींगसाठी लोणावळ्यात गेलेल्या तरूणाचा मृतदेह जंगलात सापडला; शोधणाऱ्यास १ लाखांचे बक्षीस जाहीर केले होते
पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी भ्रष्टाचारी मंत्र्याची हकालपट्टी करताच केजरीवालांना अश्रू अनावर; म्हणाले…
शेणाचा अनोखा फायदा! ओडिशातील गृहिणीने सुरू केला शेणापासून ‘हा’ व्यवसाय, कमावते बक्कळ पैसा