प्रसिद्ध मराठी अभिनेत्री केतकी चितळेने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली होती. या प्रकरणी पोलिसांनी तिला अटक केलेली आहे. गेल्या दोन आठवड्यापासून केतकी चितळे तुरुंगात आहे. एकाच गुन्ह्याखाली तिच्यावर राज्यात २२ ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहे. (ketki advocate meet governer)
फेसबूक पोस्ट प्रकरणातून तिला अद्यापही जामीन मिळालेला नाही. कळंबोली पोलिस ठाण्यातील पोलिसांनी तिला ताब्यात घेतले असताना तिच्यावर शाईफेकही झाली होती. तसेच तिला मारहाण करण्याचा प्रयत्न झाला पण त्याची तक्रारही नोंदवून घेण्यात आली नाही. या सर्व तक्रारी घेऊन केतकीचे वकील राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या भेटीला पोहोचले होते.
केतकी चितळेच्या प्रकरणात राज्यपाल आणि केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा अशी मागणी यावेळी केतकीच्या वकीलांनी केली आहे. तसेच याप्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणीही केतकीचे वकील योगेश देशपांडे यांनी केली आहे. त्यामुळे आता राज्यपाल यावर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
केतकीला एका गंभीर गुन्ह्यातील आरोपीसारखी वागणूक दिली जात आहे. २२ ठिकाणी तिच्याविरोधात गुन्हे दाखल होणे, तिच्यावर हल्ला करणे, त्यानंतर हल्लेखोर महिलेने माध्यमांसमोर येऊन केलेल्या योजनेची माहिती देणे. हा सगळा नियोजनाचा भाग आहे, असा आरोप योगेश देशपांडे यांनी म्हटले आहे.
तसेच हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतरही तिथे जामीन नाकारणे, तिच्या कोठडीत वाढ होणे, हेही कायद्याला धरुन नसल्याचे वकीलांनी म्हटले आहे. या प्रकरणात महाराष्ट्रात कायदा कोलमोडून पाडण्यात आला आहे, असा दावाही योगेश देशपांडे यांनी केला आहे.
केतकीवर तीन दिवसांत आरोपपत्र दाखल करण्यात आले, त्याची कॉपी सुद्धा वकीलांना दिली नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तिच्यावर पोलिसांसमोर हल्ले होतात. ती बाहेर असती, तर तिचे काय केले असते. राज्य सरकारकडून हे जाणीवपूर्वक केले जात आहे, असेही केतकीच्या वकीलांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
भारताला मिळाला दुसरा युवराज! ६ चेंडूंवर ६ षटकार ठोकले अन् १९ चेंडूत बनवल्या ८३ धावा; पहा व्हिडीओ
मुस्लिमांनी लुटली मुस्लिमांची दुकाने; वाचा कानपूर हिंसाचारातील पडद्यामागील सत्य घटना…
“पंतप्रधान मोदींनी रशिया आणि युक्रेनमधील युद्ध ३ तास थांबवले होते”