आपल्या परखड वक्तव्यासाठी विशेष ओळखली जाणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे केतकी चितळे (Ketaki Chitale). ती समाजात घडणाऱ्या घटना आणि तीला न पटणार्या गोष्टींविषयी परखड शब्दात मत मांडते. केतकी सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. नुकतीच केतकीची एक सोशल मीडियावर पोस्ट चर्चेत आली आहे.
केतकी तिच्या वक्तव्यामुळे अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकते. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री केतकीने काॅंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी एक आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यामुळे मोठा वाद पेटला होता. तर त्यावेळी केतकीला अटक करण्यात आली होती. आता तिने केलीय आणखी एक पोस्ट चर्चेत आहे.
नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत केतकीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये केतकी धुम्रपान करताना दिसत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर नेटकर्यांनी तीला प्रचंड ट्रोल केले आहे. तसेच सुरुवातीपासूनच वर्ष भीमा कोरेगाव (Bhima Koregaon) ही घटना चर्चेचा विषय ठरत आहे. यावरून बरेच मतभेद होतात.
मात्र, केतकीने भीमा कोरेगाव येथील ऐतिहासिक लढाईची आठवण म्हणून एकाही पोस्ट शेअर केलेली नाही. त्यामुळे केतकी चितळेला प्रचंड ट्रोल केले गेले. याच ट्रोलिंगला केतकीने सडेतोड प्रतिउत्तर दिले आहे. त्यामुळे ती पुन्हा वाद सापडले का? असं प्रश्न उपस्थित झाला आहे.
कमेंट्स करताना नेटकर्यांनी लिहीले की, तमाम भारतीयांना तुम्ही भीमा कोरेगाव शौर्य दिनी शुभेच्छा द्याल, असे वाटले होते. तुमच्याकडून आजचा दिवस दुर्लक्षित होत अनपेक्षित आहे. नेटर्यांच्या या कमेंट्वर केतकी चांगलीच संतापली आहे.
भीमा कोरेगाव म्हणजे तीच जागा जिथे ब्रिटिश सैन्यातील तुकडी पेशव्यांच्या विरोधात लढली?! ब्रिटिश सरकारच्या बाजूने मराठा सैन्याविरुद्ध लढणाऱ्या लोकांना मी शुभेच्छा देण्याची तुम्ही अपेक्षा ठेवता म्हणजे एक तर तुम्हाला मी राष्ट्रद्रोही (धर्मद्रोही) वाटते, किंवा तुम्हाला खरा इतिहास माहिती नाही. यातील नेमके काय? असे प्रतिउत्तर केतकीने दिले आहे.
महत्वाच्या बातम्या-
अनंत अंबानींच्या एंगेजमेंटमध्ये १० मिनीट नाचायला मिकासिंगने घेतले ‘इतके’ कोटी; आकडा ऐकून थक्क व्हाल
गाडी चालवतानाच ड्रायव्हरला आला हार्टॲटॅक; फॉर्च्युनरला धडकली बस, 9 जागीच ठार 32 गंभीर जखमी
सासऱ्याला दारू पाजून फूल टल्ली केले अन् सासूला घेऊन फरार झाला जावई; घटनेने खळबळ