क्रिकेटपटू त्यांच्या क्रिकेटमुळे आणि खाजगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांच्या अफेअर्स, लग्नाबाबत नेहमीच चर्चा होत असते. आता एका दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूच्या लग्नाची बातमी समोर आली आहे. विशेष म्हणजे त्याने एका भारतीय वंशाच्या मुलीशी लग्न केले आहे. त्यामुळे ते दोघेही चर्चेत आले आहे.
दोघांची प्रेम कहानी खुपच वेगळी आहे. त्यांच्या लग्नासाठी त्यांना कुटुंबाच्या सदस्यांना मनवावे लागले होते. आफ्रिकेच्या क्रिकेटपटूने आईच्या वाढदिवसानिमित्त प्रेयसीसोबत डान्स केला होता. त्या दोघांचे ते प्रेम पाहून त्याच्या आईने लग्नाला होकार दिला होता.
केशव महाराज असे त्या खेळाडूचे नाव आहे आणि तो हनुमानचा भक्त आहे. २०२२ मध्ये केशवने लरीशा या भारतीय वंशाच्या मुलीशी लग्न केले आहे. ते २०२० मध्येच लग्न करणार होते. पण कोरोनामुळे त्यांना लग्न करता आले नाही. पण त्यानंतर २०२२ मध्ये त्यांनी लग्न केले आहे.
२०२२ मध्ये त्यांनी भारतीय पद्धतीनुसार लग्न केले आहे. त्यांची भेट एका मित्राच्या माध्यमातून झाली होती. त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली आणि त्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. प्रेमात पडल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण त्यांच्या कुटुंबियांना मनवणे कठीण होते.
केशवच्या कुटुंबियांसाठी लरीशाची पार्श्वभूमी खुप वेगळी होती. त्यामुळे त्यांना ते मान्य असेल की नाही हे केशवला माहित नव्हते. त्यामुळे त्याने आईच्या वाढदिवासाच्या दिवशी एक मोठा कार्यक्रम ठेवला. त्यामध्ये लरीशाने आणि केशवने खुप डान्स केला. त्या दोघांना असं पाहून ते दोघे एकमेकांवर प्रेम करतात हे त्याच्या आईला कळले आणि तिने होकार दिला.
लरीशा ही उत्तम डान्सर आहे. तिचा डान्स पाहून केशवची आई खुप खुश झाली. तसेच जेव्हा ती लरीशाला भेटली तेव्हा तिला अजून जास्त आनंद झाला. त्यामुळे तिने या लग्नाला होकार दिला. लरीशाला भारतीय संस्कृती माहिती असून ती त्याचा आदरही करते.
महत्वाच्या बातम्या-
‘प्लिज मला वाचवा, आयुष्यभर तुमची गुलामी करेल…’; चिमुकलीचा व्हिडिओ पाहून अंगावर येईल काटा
…तर कसबा आणि चिंचवडची निवडणूक होणार रद्द; वाचा कायदेतज्ज्ञ नक्की काय म्हणाले?
मोदी सरकारची भन्नाट योजना! सर्वांना दरमहा मिळणार ९ हजार रूपये, करावी लागेल फक्त ‘ही’ गोष्ट