सध्या जगभरात सुरु असलेल्या मंदीची एकच चर्चा सुरु आहे. कधी कोणाची नोकरी जाईल हे सांगता येत नाही. प्रत्येकालाच या मंदीचा सामना करावा लागत आहे. कोरोना काळातही अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या होत्या. त्यामुळे पैशांची बचत करणे आता महत्वाचे झाले आहे.
पैशांची बचत करण्यासाठी केंद्र सरकार वेगवेगळ्या योजना लोकांसाठी राबवत असते. या योजनांमध्ये पैसे गुंतवले तर तुम्हाला मोठ्या प्रमाणात याचा परतावा मिळू शकतो. तसेच या सरकारी योजनांमध्ये पैसा गुंतवला तर तो सुरक्षित सुद्धा असतो. आता आपण अशाच एका योजनेबद्दल पाहणार आहोत जी तुमच्यासाठी फायद्याची ठरू शकते.
केंद्र सरकारची अशी एक योजना आहे, ज्यामध्ये तुम्ही एक रकमी पैसे गुंतवू शकतात. तसेच दरमहिन्याला तुम्हाला त्यातून ठराविक रक्कमही मिळते. त्यामुळे कोणत्याही प्रकारची आर्थिक अडचण आली तर ते पैसे तुमच्यासाठी उपयुक्त ठरु शकतात.
पोस्ट ऑफिसची मासिक उत्पन्न योजना आहे. त्या योजनेचे खाते तुम्हाला बनवावे लागते. या योजनेत एकाचवेळी ठराविक रक्कम तुम्हाला गुंतववावी लागते. या योजनेत तुम्ही एकाचवेळी मोठी रक्कम गुंतवून दरमहा चांगली रक्कम खात्यात काढू शकतात. ते उत्पन्न तुम्हाला व्याजाच्या स्वरुपात मिळेल.
या योजनेनुसार जानेवारी-मार्च २०२३ साठी ७.१ टक्के व्याजदर निश्चित करण्यात आला आहे. पण सरकार नियमितपणे व्याजदरांमध्ये बदल करत असतं. पोस्ट ऑफिसच्या या योजनेचा लॉक इन कालावधी पाच वर्षांचा आहे. तुम्ही गुंतवणूक केलेली रक्कम तुम्ही मॅच्युरिटीनंतर काढू शकतात.
यंदाच्या अर्थसंकल्पातही याबाबत मोठी घोषणा करण्यात आली होती. २०२३ च्या अर्थसंकल्पात या योजनेतील गुंतवणूकीची कमाल मर्यादा एकल खात्यासाठी ४.५ लाख रुपयांवरुन ९ लाख रुपये आणि संयुक्त खात्यासाठी १५ लाख रुपये केली जाणार आहे.
या खात्यात १५ लाख रुपये गुंतवले जाऊ शकतात. म्हणजेच जर १५ लाख रुपये गुंतवले तर जवळपास ८,८७५ रुपये म्हणजेच ९ हजार रुपये मासिक उपन्न म्हणून गुंतवणूकदारांना मिळू शकते. तर ९ लाखाच्या ठेवीवर ५,३२५ रुपये मिळेल. त्यामुळे ही योजना सामान्य नागरिकांसाठी खुप फायद्याची ठरु शकते.
महत्वाच्या बातम्या-
मुंबई केंद्रशासित होणार, महाराष्ट्राचे तुकडे होणार…; एकनाथ शिंदेंचे वरळीत मोठे वक्तव्य
थोरातांच्या राजीनाम्यानंतर अजित पवारांनी लगेचेच केला फोन; थोरात म्हणाले, दादा मला आता….
अयोध्येत खास शिळा दाखल, पण छन्नी, हतोडी चालणार नाही; संशोधक म्हणाले, ही शिळा…