काल राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस असल्याने मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. रावणाचा जीव जसा बेंबीत होता. मात्र काही जणांना केंद्रात सरकार मिळाले तरी त्यांचा जीव मुंबईत आहे, अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपावर केली आहे.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी विरोधकांना रोखठोक उत्तर दिली. ‘कुटुंबाची बदनामी करायची, धाडी घालायच्या, मालमत्तांवर टाच आणायची हे शिखंडीचे राजकारण बंद करा आणि मर्दासारखे अंगावर या. मी तुमच्याबरोबर येतो. मला आधी तुरुंगात टाका, मग पुरावे गोळा करा; पण कुटुंबीयांची बदनामी थांबवा, असे म्हणत ठाकरे यांनी भाजपला लक्ष केले.
ठाकरे यांनी दिलेल्या प्रत्युत्तरानंतर आता भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे. भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी याबाबत ट्विट करत शिवसेनेला घरले आहेत. ट्विटमधून केशव उपाध्ये यांनी काही सवाल उपस्थित केले आहेत. याचबरोबर त्यांनी थेट उद्धव ठाकरेंना लक्ष केले आहे.
https://twitter.com/keshavupadhye/status/1507555566105018377?s=20&t=iMOkWSan7CrDBCZg5-YQ7g
ट्विटमध्ये केशव उपाध्ये म्हणतात, “मुंबईतील दंग्यात वाचविणाऱ्या शिवसैनिकांना त्रास देऊ नका. मला अटक करा असे छातीठोक सांगणाऱ्या ठाकरेंनी कृपया सांगा पाटणकर, यशवंत जाधव, प्रताप सरनाईक हे कोणत्या दंगलीत मुंबईकरांना वाचवत होते? मुळात बॅाम्बस्फोट करणाऱ्या दाऊदशी मालमत्ता घेणाऱ्या नबाबच समर्थन आपण करत आहात.”
तर दुसरीकडे अर्थसंकल्पीय अधिवेशनातील मुख्यमंत्र्यांच्या घणाघाती भाषणानंतर राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. विरोधकांच्या सर्व आरोपांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिरफाड केली आहे. तसेच महाराष्ट्र हा कधीही झुकणार नाही, असेही आदित्य यांनी सांगितले.
तसेच महाराष्ट्रात केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू असल्याचा आरोप देखील उद्धव ठाकरेंनी केला होता. विरोधकांकडून होत असलेले गंभीर आरोप, केंद्रीय यंत्रणांवर होत असलेल्या कारवाया, शिवसैनिक आणि नातेवाईकांवर होणारे आरोप या सर्वांना उद्धव ठाकरे यांनी चोख प्रत्युत्तर दिले.
महत्त्वाच्या बातम्या
“माझी सैराटसाठी निवड झाली नाही, पण अचानक…”, ‘झुंड’मधील ‘भावना भाभी’ने सांगितला भन्नाट किस्सा
ट्विट करायला कोणी पैसै दिले होते का? विवेक अग्निहोत्रींवर ट्विट करणे कुणाल कामराला पडले महागात, युजर्स संतापले
भगवंत मानचा यांचा आमदारांना दणका! पेंशनबाबत घेतला मोठा निर्णय; वाचून तुम्हीही कौतूक करा
द काश्मीर फाइल्स पाहून महिलेने केलं असं काही की दिग्दर्शकही झाला भावूक; म्हणाला, माझ्याकडे शब्दच नाहीये…