राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून भाजप नेते सत्ताधारी पक्षातील नेत्यांवर टीका करताना दिसून येत आहे. अनेकदा भाजप नेते मुख्यमंत्र्यांवरही निशाणा साधताना दिसून येतात. आता सध्या भाजप नेते शिवसेनेला हिंदूत्वावरुन टीका करत आहे. (keshav upadhye criticize uddhav thackeray)
अशात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनसे आणि भाजपचे हिंदूत्व किती बोगस आहे हे जनतेला दाखवून द्या. तसेच भाजपच्या आरोपांना सडेतोड उत्तर द्या. याबरोबरच भाजपवर तुडून पडा, असे आदेश दिले होते. आता यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
भाजप मनसेवर तुडून पडा. सगळ्यांना सडेतोड उत्तर द्या… इति मुख्यमंत्री जी. तुम्ही तुटून पडले, तर मी घरातून बुळबुळीत टोमणे मारेन, असे म्हणत चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. तसेच भाजप नेते केशव उपाध्ये यांनीही ट्विट करत मुख्यमंत्र्यांना सुनावलं आहे.
भाजपवर तुडून पडा, असे आदेश वर्क फ्रॉम होम करणाऱ्या मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सेना प्रवक्त्त्यांना नुकतेच दिलेत म्हणे. त्यात हिंदुत्व खोटं ठरवण्यासही सांगितलंय. पण ज्यांचं हिंदुत्व मुख्यमंत्रीपदासाठी पवार गांधींकडे गहान पडलंय. ज्यांचा हिंदुत्वाशी संबंध केवळ बोलण्यापुरता राहिलाय. त्यांनी भाजपच्या हिंदुत्वावर बोलूच नये, असे केशव उपाध्ये यांनी म्हटले आहे.
तसेच हिंदुत्वाचा मुद्दा कधी धरते तर कधी सोडते अशी भूमिका शिवसेनेची असल्याचे केशव उपाध्ये यांनी म्हटले आहे. भाजपसाठी हिंदुत्व हा आत्मा आहे. तुमच्यासारखं गरज असेल तेव्हा वापरलं आणि नसेल तेव्हा सोडून दिलं असलं आम्ही कधी केलं नाही, असा टोलाही केशव उपाध्ये यांनी लगावला आहे.
तसेच आता १ मे ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा आहे. गुढीपाडव्यानिमित्त राज ठाकरेंनी घेतलेल्या सभेत त्यांनी हिदुत्वाची भूमिका मांडत शिवसेनेवर आक्रमक झाले होते. तसेच सत्ताधारी नेत्यांवरही टीका केली होती. त्यामुळे आता औरंगाबादच्या सभेत राज ठाकरे कोणावर निशाणा साधणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
महत्वाच्या बातम्या-
ढसाढसा रडत पायल रोहतगीने लॉकअपमध्ये सांगितले जीवनातील वाईट सत्य, म्हणाली, मी कधीच..
निवडून आल्यानंतर बॉलिवूडने केले नाही शत्रुघ्न सिन्हांचे अभिनंदन, म्हणाले, सगळ्यांना भिती आहे की..
दुसऱ्याच्या आनंदात आपला आनंद शोधणारे आई आणि वडील; ‘लागिरं झालं जी’ फेम संतोष पाटील यांची पोस्ट चर्चेत