Share

५० हजारांहून अधिक सापांना वाचवणाऱ्या स्नेक मॅनच्या मांडीचा कोब्राने घेतला चावा; भयानक व्हिडिओ व्हायरल

इंडियन स्नेक मॅन आणि स्नेक मास्टर म्हणून प्रसिद्ध असलेला केरळचा वावा सुरेश यावेळी स्वतःच कोब्राचा शिकार ठरला आहे. केरळमधील कोट्टायम जिल्ह्यात सोमवारी ४७ वर्षीय वावा सुरेश यांना कोब्राला जंगलात सोडत असताना कोब्राने चावा घेतला. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (keral snake man bite by cobra)

केरळचे मंत्री व्हीएन वसावन यांनी सांगितले की, लोकप्रिय सर्प पकडणारा वावा सुरेश यांना कोट्टायममधील कुरिचीजवळ नागाने चावल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना कोट्टायम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना रुग्णालयात सर्व सुविधा पुरविल्या जात आहेत.

वावा सुरेश सोमवारी कोट्टायम गावात साप पकडल्यानंतर जंगलात निघून जात होता. तो सापाला पकडून गोणीत ठेवत असताना तो साप अनियंत्रित झाला आणि त्याच्या गुडघ्याचा चावा घेतला. या घटनेचा व्हिडिओ स्थानिक नागरिकांनी शूट केला आहे. स्थानिकांनी सुरेशला खासगी रुग्णालयात नेले. मात्र, त्याआधीच सुरेशने साप पिशवीत ठेवला.

सुरेशला येथे आणले तेव्हा तो बेशुद्ध होता, असे रुग्णालयातील डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्याची प्रकृती गंभीर आहे. त्याला अँटी व्हेनम म्हणजेच विषविरोधी औषध दिले जात आहे. साप पकडण्यात सुरेश संपूर्ण राज्यात खूप लोकप्रिय आहे. एखाद्याला धोकादायक साप दिसताच त्याने सुरेशला फोन करत असतो.

सुरेश लवकरच तिथे हजर होतो आणि सापाला पकडून सुरक्षित ठिकाणी सोडतो. त्यांनी एका खाजगी टीव्ही चॅनलवर त्यांच्या साप बचाव मोहिमेवर आधारित एक कार्यक्रमही सुरू केला आहे. एका मुलाखतीत सुरेशने सांगितले आहे की, त्याला आतापर्यंत २५० वेळा साप चावला आहे. २०२० मध्ये, त्याला पिट वाइपरने चावा घेतला, त्यानंतर त्याला तिरुअनंतपुरममधील हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये एक आठवडा काढावा लागला.

सुरेशला सापांचा मसिहा आहे असे म्हणतात. भटक्या सापांना वाचवण्याचा त्यांचा छंद आहे. एका रिपोर्टनुसार, सुरेशने आता ५० हजारांहून अधिक साप पकडून सुरक्षित ठिकाणी नेले आहेत. मात्र, सुरेश साप पकडण्याच्या बदल्यात कोणाकडूनही पैसे घेत नाही.

तसेच त्याच्या कामाने प्रभावित होऊन २०१२ मध्ये केरळचे मंत्री केबी गणेश कुमार यांनी त्याला स्नेक पार्कमध्ये सरकारी नोकरीची ऑफर दिली, पण सुरेशने ती नाकारली. सुरेशने सांगितले की, नोकरी करताना तो समाजाला हवी तशी मदत करू शकत नाही. पश्चिम घाटात सापांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. त्यामुळेच सुरेशने सापांना वाचवणे हे आपले ध्येय बनवले आहे.

महत्वाच्या बातम्या-
budget 2022: आता इलेक्ट्रिक बाईक आणि कार चालवणे होणार सोपे, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा
“आता नारायण राणेंना कायदा काय असतो हे खऱ्याअर्थाने माहित पडलं असेल”
मृतांचा आकडा लपवणाऱ्या चीनचा बुरखा फाटला, गलवान झटापटीत चीनचे ३८ सैनिक झाले होते ठार

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now