शुक्रवारी म्हणजेच ४ मार्चला नागराज मंजुळे दिग्दर्शित झुंड चित्रपट प्रदर्शित झाला. झुंड चित्रपटात अमिताभ बच्चन, आकाश ठोसर, रिंकू राजगुरु यांनी प्रमुख भूमिका बजावल्या आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर चित्रपटाचे कौतूक केले आहे. (kedar shinde tweet on jhund)
प्रसिद्ध अभिनेता आमिर खान, धनूष यांनीही या चित्रपटाचे कौतूक केले आहे. या चित्रपटाबाबत अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहे. काही कलाकारांनी या चित्रपटावरुन नागराज मंजुळे यांना ट्रोलही केले आहे. असे असतानाच आता दिग्दर्शक केदार शिंदे यांचं एक ट्विट सध्या चर्चेत आले आहे.
केदार शिंदे हे आपल्या वक्तव्यांमुळे ओळखले जातात. ते अनेकदा वेगवेगळ्या विषयांवर आपले मत मांडताना दिसून येतात. आता त्यांनी झुंड या चित्रपटावर भाष्य केले आहे. तसेच यावेळी केदार शिंदे यांनी झुंड का बघितला पाहिजे? हेही सांगितले आहे.
जात.. जात नाही तोवर माणूस म्हणवून घ्यायची आपली लायकी नाही. #झुंडसिनेमाम्हणूनपाहा
— 🄺🄴🄳🄰🅁 🅂🄷🄸🄽🄳🄴 (@mekedarshinde) March 5, 2022
केदार शिंदे यांनी ट्विट केले आहे. ते म्हणाले, जात… जात नाही तोवर माणूस म्हणवून घ्यायची आपली लायकी नाही. म्हणून झुंड हा चित्रपट पाहा. असे ट्विट केदार शिंदे यांनी केले आहे. सध्या केदार शिंदेंचे हे ट्विट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.
दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून झुंड हा चित्रपट खुप चर्चेत होता. विजय बारसे यांच्यावर आधारित हा चित्रपट आहे. तसेच नागराज मंजुळेंचा हा पहिला बॉलिवूड चित्रपट आहे. या स्पोर्ट्स ड्रामा चित्रपटात बिग बी फुटबॉल प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
या चित्रपबाबत बोलताना नागराज मंजुळे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, हा चित्रपट करायचा विचार आला तेव्हा वाटलं हा चित्रपट का करायचा? मग जेव्हा मी याबद्दल संशोधन केले तेव्हा असे वाटले की ही माझी आणि माझ्यासारख्या लोकांची कथा आहे. या चित्रपटातून मी माझी कथाही सांगत आहे आणि विजय जींची कथाही पडद्यावर दाखवत आहे. चित्रपट लिहिताना माझ्या लक्षात आले की, हा चित्रपट विजय जी आणि त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांची कथा आहे. त्यामुळे मी चित्रपटाला झुंड असे नाव दिले.
महत्वाच्या बातम्या-
झुंड चित्रपटासाठी अमिताभ बच्चनने दिला होता नकार, पण…; वाचा काय आहे आमिर खानचं झुंडसोबतचं कनेक्शन
पाकिस्तानी विद्यार्थ्यांच्या हातात चक्क भारताचा झेंडा, स्वत:ला वाचवण्यासाठी घेतला तिरंग्याचा आधार
युक्रेनमधील विद्यार्थ्यांची मोदींनी घेतली भेट; म्हणाले, याला आम्ही नाही तर आधीची सरकारेच जबाबदार