Share

एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाचा कारभार हाती घेताच आनंद दिघेंच्या पुतण्याने केली ‘ही’ मोठी मागणी

राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा कारभार स्विकारला आहे. अखेर काल एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. दहा दिवसांच्या नाट्यमय घडामोडीनंतर अखेर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.

आता राज्यात शिंदेशाही पर्वास सुरुवात झाली आहे. तर आता आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी फेसबुक पोस्ट करत शिंदेंना एक मागणी केली आहे. दरम्यान, उद्धव ठाकरेंना शपथविधीसाठी निमंत्रण देण्यात आले होते. परंतू ते एकनाथ शिंदेंच्या शपथविधीला गेले नव्हते.

मात्र अखेर उद्धव ठाकरे यांनी ट्विट करत महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री  आणि उपमुख्यमंत्री  यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. ट्विटमध्ये उद्धव ठाकरे म्हणतात, महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री  आणि उपमुख्यमंत्री  यांना भावी वाटचालीस शुभेच्छा. आपल्या हातून महाराष्ट्रामध्ये चांगले काम होवो, ही इच्छा.’

आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघे यांनी ठाकरेंच्या शुभेच्छाला अनुसरूनच विधीमंडळात मंजुर केलेल्या शक्ती विधेयकास राष्ट्रपतींकडुन मान्यता व मराठी भाषेला अभिजात दर्जासाठी प्रयत्न करावा ही अपेक्षा,अशी मोठी मागणी एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

वाचा काय म्हंटलं आहे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये..
#महाराष्ट्र माजी ऊद्धवसाहेबांनी आपणांस शुभेच्छा दिल्या आहेतच. माझ्याकडुन आपणांस हार्दिक शुभेच्छा…एकनाश शिंदे. देवेंद्र फडणवीस विधीमंडळात मंजुर केलेल्या शक्ती विधेयकास राष्ट्रपतींकडुन मान्यता व मराठी भाषेला अभिजात दर्जासाठी प्रयत्न करावा ही अपेक्षा, असे केदार दिघे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, आता एकनाथ शिंदे हे केदार दिघे यांची मागणी पूर्ण करणार का? हे पाहणे महत्त्वाच ठरणार आहे. विधान परिषदेचा निकाल लागला अन् दुसरीकडे शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्याच्या राजकारणात भूकंप झाला. अखेर शिंदे यांच्या बंडामुळे ठाकरे सरकार कोसळलं.

महत्त्वाच्या बातम्या
बातमी विद्यार्थ्यांसाठी! बारावीनंतर ‘हे’ कोर्सेस करा, नोकरीची १०० टक्के खात्री
आलिया-दीपिका नाही तर ‘ही’ अभिनेत्री आहे रणबीर कपूरची फेव्हरेट, म्हणाला, तिच्यासोबत रोमान्स…
‘त्या’ पत्राने घात केला अन् शिकारी स्वतःच जाळ्यात अडकला; वाचा फडणवीसांबद्दल नेमकं काय घडलं
KGF मधील प्रसिद्ध अभिनेत्याचा भयानक अपघात, कारला ट्रकने दिली धडक, पोलिसांनी ट्रक चालकाला घेतलं ताब्यात

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now