Share

पोलिस असल्याचे सांगत भोसरी पोलिस ठाण्यात तरुणीने घातला गोंधळ; सत्य समोर आल्यावर सगळेच हादरले

अनेकदा लोक पोलिसांची नक्कल करताना दिसून येतात. काहीवेळा वैयक्तिक फायद्यासाठी ते पोलिस बनण्याचे नाटक करतात, तर कधी लोकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी ते असे करतात. आता असाच एक प्रकार पुण्यातील भोसरीमधून समोर आला आहे. (kavita dodake fake police in bhosari police station)

एका तरुणीने आपण पोलिस असल्याचे खोटं सांगत चांगलाच गोंधळ घातला आहे. या सर्व गोष्टीमुळे भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यातील पोलिसांचा देखील गैरसमज झाला आहे. पण एका पोलिस अधिकाऱ्याच्या प्रसंगावधानामुळे त्या तरुणीचं बिंग फुटलं आहे.

तसेच हे सगळं का केलं? त्याचं कारणही तरुणीने सांगितलं आहे. संबंधित तरणीचे नाव कविता दोडके आहे. ती २७ वर्षांची आहे. कविता दोडके ही २४ वर्षाच्या तरुणासोबत पोलिस स्टेशनमध्ये पोहचली होती. बाळू पोटभरे नावाच्या वक्तीची चौकशी कशाला करत आहात? मलाही कायदा कळतो, असे म्हणत कविताने गोंधळ घातला होता.

काही वेळ कविताने पोलिस असल्याचा अभिनय इतका हुबेहुब केला की तिथले पोलिसही गोंधळून गेले होते. मात्र त्याच्यातल्याच एका पोलिसाने प्रसंगवधान दाखवत कविताला तिचा बक्कल नंबर विचारला. तिथे मात्र ती गोंधळून गेली आणि पोलिसांना तिची खरी हकीकत कळली.

कविता आणि संतोष पोटभरे यांचे प्रेमसंबंध आहे. त्याचा भाऊ बाळू पोटभरे याच्यावर एका कार्यलय तोडफोडीचा आरोप आहे. बाळूचा शोध घेण्यासाठी पोलिस त्याच्या घरी पोहचले होते. त्यानंतर संतोषने लगेच याबाबत कविताला सांगितलं. त्यानंतर आपण मुंबई पोलिसांत असल्याचं सांगत तिने पोलिस स्टेशनमध्ये गोंधळ घातला होता.

अशात कविताचे सत्य समोर आल्यानंतर कवितासोबतच तिचा प्रियकर संतोषवरही पोलिसांच्या सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम यांनी दिली आहे.

यावेळी पोलिसांनी तपास केला तेव्हा कविताने तिच्या प्रियकरालाही फसवल्याचं समोर आलं आहे. मी मुंबई पोलिसांत आहे. मला निलंबित केलं गेलं आहे, असे खोटं कविताने संतोषला सांगितलं होतं. तिने पोलिस भरतीची परीक्षा दिली होती. पण परीक्षा पास न होऊ शकल्याने तिला पोलिस बनता आलं नाही, असे कविताने पोलसांना सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

डुप्लिकेट सलमान खानला दबंगगिरी पडली महागात, पोलिसांनी ‘या’ कारणामुळे केली अटक

२२ वर्षांचा संसार मोडत हिमेश रेशमियानं केलं होतं दुसरं लग्न, ‘या’ कारणामुळे तुटलं पहिलं नातं

Doctor Strange 2 पाहिल्यानंतर पाकिस्तानी चाहत्यांनी आपल्याच फिल्ममेकर्सला झापले, म्हणाले…

 

ताज्या बातम्या राज्य

Join WhatsApp

Join Now