संपूर्ण देशभरात चर्चेचा विषय ठरणाऱ्या ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी टीका केली आहे. आज पत्रकारांशी संवाद साधताना ‘या चित्रपटाच्या मध्यंतरानंतरच माणूस झोपी जातो’ असा टोला मिटकरी यांनी लगावला आहे. एकेकडे चित्रपटाचे कौतुक होत असताना मिटकरींनी केलेल्या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
पत्रकारांशी संवाद साधताना, “मी आयुष्यात जितके चित्रपट पाहिले आहेत त्यात कश्मीर फाइल्स पण पाहिला. इंटरव्हलनंतर माणूस झोपी जात असेल तर तो कश्मीर फाइल्समध्ये. संजय राऊत यांनी पण सांगितलं होत की त्या कश्मीर फाइल्समध्ये तेवढं फारसं काही सत्य नाही. असे मिटकरींनी म्हटले आहे.
तसेच, कश्मीर फाइलमध्ये असं एक वाक्य आहे की बालासाहेब ठाकरेने हमे बचाया. काश्मिरी पंडितांनी असं सांगितलं की बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला घरं दिली. आता त्यावरुन भाजपावाले टॅक्स फ्री करण्याचं आवाहन करेल अस वक्तव्य मिटकरींनी केल आहे. कश्मीर फाइल्स हा चित्रपट काही तरुणांच्या मनात उतरण्यासारखा नव्हता. नंतर आमच्या भागातल्या आमदाराने थेअटरमध्ये फ्री केला. तरी लोकं पहायला जात नसल्याच मिटकरींनी बोलून दाखवल आहे.
पुढे त्यांनी म्हटले आहे की, “काश्मीर फाइल्सच्या नावाखाली राजकारण भारतीय जनता पार्टी करतेय ते साफ चुकीचं आहे. कश्मीर फाइल्स हा हिंदुत्वाचा अजेंडा आहे. तो का सुपर हिट होतोय तर मोहन भागवत बोलले, नरेंद्र मोदीजी बोलले म्हणून कश्मीर फाइल्स हिट होतोय. बाकी त्या चित्रपटातून प्रेरणा घ्यावी असं काही नाहीय”
यावेळी पत्रकारांशी झुंड चित्रपटाविषयी बोलताना, “झुंडमधून आम्ही प्रेरणा घेऊ शकतो. झोपडपट्टीमधील मुलं राष्ट्रीय स्पर्धा कशी गाजवू शकतात हे नागराज मंजुळेंनी सांगितलंय त्यातून काही प्रेरणा तरुण घेऊ शकतात. कश्मीर फाइल्समध्ये फक्त आणि फक्त मुस्लीम द्वेष आहे आणि आपलं सोयीचं राजकारण एवढाच भाजपाचा उद्देश आहे,” अशी टीका भाजपावर त्यांनी केली आहे.
दरम्यान, “परवा एक भाजपाचे आमदार माझ्यासोबत एका वृत्तवाहिनीवर चर्चासत्रामध्ये होते. त्यांनी सांगितलं तुम्ही झुंड टॅक्स फ्री करु शकता कश्मीर फाइल्स का नाही? म्हणजे भाजपाच्या मनामध्ये झुंड चित्रपटाबद्दल जो आकस आहे, द्वेष आहे त्याचा मी थोडा पाठपुरावा केला. त्यातून अमिताभ बच्चनसारखा मोठा सेलिब्रिटी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पाया पडतो हे भाजपाच्या लोकांना खटकलंय असं दिसतंय,” असा टोला अमोल मिटकरी यांनी भाजपला लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या
..त्यामुळे मावळची जागा ही पार्थ पवारांना देण्यात यावी, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची मागणी
शेअर १० पैशांचा पण फायदा कोट्यावधींचा! गुंतवणूकदार झाले मालामाल, १० हजारांचे झाले ५ कोटी
दाम्पत्य विमानात चढलं आणि कोणीच नव्हतं, पुन्हा काऊंटरला जाऊन चौकशी करताच बसला धक्का
‘आम्ही म्हणायचे ठाकरे सरकार पण प्रत्यक्ष लाभ घेते ‘पवार सरकार”, शिवसेना खासदाराचा घरचा आहेर