Share

दोन तरुणींसोबत प्रेमसंबंध ठेवणे तरुणाला पडले महागात; असा गेला जीव की वाचून हादरुन जाल

असे म्हणतात प्रेमात काहीही होऊ शकते. या प्रेम प्रकरणातून अनेकदा काही धक्कादायक घटना समोर येत असतात. आता कर्नाटकात एका लव्ह ट्राएंगलचे एक हैराण करणारे प्रकरण समोर आले आहे. एका तरुणाने आपल्या दोन गर्लफ्रेंडला दक्षिण कन्नड जिल्ह्यातील सोमेश्वरा बीचवर एकत्र भेटण्यासाठी बोलावले होते. पण तिथे भांडण झाले आणि भांडणात त्या तरुणाचाच जीव गेला आहे. (karnatak love tringale boy friend death)

त्या ठिकाणी तिघांमध्ये वाद झाल्यानंतर एका गर्लफ्रेंडने समुद्रात उडी मारली. यानंतर तरुणानेही तिला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली. यादरम्यान त्याची गर्लफ्रेंड वाचली, मात्र तो वाचू शकला नाही. मृत्यू झालेल्या तरुणाचे वय २८ असून त्याचे नाव लॉयड डिसोझा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण कन्नड जिल्ह्यातील सोमेश्वरा बीचवर ही घटना घडली. मृत्युमुखी पडलेला तरुण लॉयड इलियारपाडावू येथील रहिवासी होता. एकाच वेळी दोन तरुणींसोबत त्याचे अफेअर सुरू होते. त्याने सोमेश्वर बीचवर अफेअरच्या चर्चेसाठी दोन्ही तरुणींना एकत्र बोलावले होते.

तिघेही एकमेकांशी संवाद साधत होते. त्यावेळी बोलत असताना त्याचा त्याच्या एका गर्लफ्रेंडशी वाद झाला. याचा राग येऊन गर्लफ्रेंडने समुद्रात उडी मारली. त्यावेळी समुद्रातील लाटा खूप उंच आणि धोकादायक होत्या. अशा स्थितीत त्याने प्रेयसीला वाचवले, पण तो स्वतःच बुडू लागला.

तरुणाला समुद्रात बुडताना पाहून आजूबाजूला उपस्थित असलेल्या लोकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. लोकांनी त्याला समुद्रातून बाहेर काढले आणि रुग्णालयात नेले. पण तो वाचू शकला नाही. लॉयड नावाचा हा तरुण अबुधाबीमध्ये काम करायचा. कोविड-१९ महामारीच्या काळात तो आपल्या गावी आला होता. वर्षभरापासून तो येथे राहत होता. यादरम्यान दोन तरुणींना सोशल मीडियावर भेटल्यानंतर त्याची त्यांच्याशी मैत्री झाली होती. त्याचवेळी दोन्ही तरुणींसोबत त्याचे प्रेमसंबंध होते.

या घटनेची माहिती देताना पोलीस आयुक्त म्हणाले की, तिघांमध्ये काही काळ अफेअरवरून वाद झाला होता. अशा परिस्थितीत या तरुणाने प्रकरण शांत करण्याचा विचार केला. हा सर्व वाद त्याला कायमचा संपवायचा होता. यासाठी त्याने दोन्ही तरुणांना बीचवर एकत्र बोलावले होते. यादरम्यान प्रेयसीला वाचवताना त्याचा मृत्यू झाला. सध्या त्याच्या प्रेयसीची प्रकृती ठीक आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या-
अर्थसंकल्पाचा राकेश झुनझुनवालांनी घेतला पुरेपूर फायदा, काही तासांत कमावले ३४२ कोटी रुपये
टीम इंडिया ऑस्ट्रेलियन संघाचा धुव्वा उडवत वर्ल्डकपच्या फायनलमध्ये, कर्णधाराची शतकी खेळी
झाडाचा बुंधा की मोठा खड्डा? मंगळावरील तो रहस्यमयी फोटो पाहून सगळेच झाले चकीत

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now